Weight Loss Diet : सध्या वाढलेल्या वजनामुळे प्रत्येक जण त्रस्त पाहायला मिळतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करतो. काही जण व्यायाम तर काही जण डाएट करुन वजन कमी करतात. सध्या डाएटिंगची एक नवी पद्धत विशेष चर्चेत आहे. ती म्हणजे उपवास. अनेक जण उपवास करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. अगदी सर्वसामान्यांपासून बॉलिवूड कलाकारांपर्यंत अनेक जण डाएटिंगची ही पद्धत निवडतात. कॉमेडियन भारती सिंह, राम कपूर यांच्यासह स्मृती ईराणी यांनीही हे डायटिंग निवडून वजन कमी केलं आहे. या डायटिंगला अधूनमधून उपवास 'इंटरमिटेंट फास्टिंग' (Intermittent Fasting) असं म्हणतात. इंटरमिटेंट फास्टिंग करताना, तुम्हाला ठराविक वेळेतच खावं लागतं. यामध्ये कॅलरी मोजल्या जात नाही तर वेळ मोजला जातो. दिवसभरात अधूनमधून उपवास करणे किंवा अधिक वेळ न खाणं यामुळे वजन कमी होण्यास मदत होते का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या.


इंटरमिटेंट फास्टिंगवरील संशोधनात काय समोर आलं?
लंडनमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापिठात इंटरमिटेंट फास्टिंगसंदर्भात काही लोकांवर एक संशोधन करण्यात आलं. त्यानंतर संशोधनात सहभागी असलेले प्राध्यापक डेव्हिड क्लेटन यांनी सांगितलं की, इतर डाएटिंगपेक्षा अधूनमधून उपवास करणं इतर डाएटिंगहून वेगळं नाही या अभ्यासात असं आढळून आलं आहे. या संशोधनात वर्षभरात लोकांना वेगवेगळं डाएट देण्यात आलं. यामध्ये काहींना एका दिवसाआड उपवास करण्यास किंवा कॅलरीचे सेवन ठरलेल्या प्रमाणात करण्यात आलं. काहींना आठवड्यातून पाच दिवस नियमित आहार आणि दोन दिवस कमी कॅलरीज घेणं म्हणजे उपवास करण्यास सांगण्यात आलं. या व्यतिरिक्त काहींना ठराविक वेळेतच कॅलरीचे सेवन करण्यास सांगण्यात आलं. म्हणजे तुम्ही फक्त आठ तासांत जेवण कराल आणि उर्वरित 16 तास उपवास करण्यास सांगण्यात आलं. पण या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, इंटरमिटेंट फास्टिंग केल्याने इतर डाएटिंगपेक्षा वजन कमी होत नाही.


इंटरमिटेंट फास्टिंगचे तोटे
इंटरमिटेंट फास्टिंग हा वजन कमी करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे, पण यामुळे वजन कमी होण्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. यामुळे स्नायूंचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शरीर कमकुवत होते. दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी चरबी कमी होणं आवश्यक आहे. पण अशा फास्टिंगमुळे मांसपेशी कमकुवत होऊन इतर समस्या उद्भवू शकतात. यामुळे शरीरात अशक्तपणा येतो.


इंटरमिटेंट फास्टिंगचे फायदे
इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये तुम्ही फास्ट फूड खाता. जर तुम्ही दुपारी 4 वाजेनंतर जास्त कॅलरीज घेतल्या नाहीत तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो. दैनंदिन कॅलरी नियंत्रणात घेतल्याने कोलेस्ट्रॉल देखील कमी होतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोषक तत्वं पचायला जास्त वेळ मिळतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत


महत्वाच्या बातम्या : 



Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator


Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )


Calculate The Age Through Age Calculator