Home Remedies For Piles: मूळव्याध (Piles) अर्थात पाईल्स ही एक सामान्य समस्या आहे. हल्लीच्या काळात अनेक लोक या समस्येचा सामना करत आहेत. परंतु, ही समस्या खूप वेदनादायक आहे. मूळव्याधाचे दोन प्रकार आहेत, एका प्रकारात मूळव्याधातून रक्त येते आणि दुसऱ्यात गुदद्वाराभोवती खाज, जळजळ आणि वेदना होतात. यामध्ये गुदद्वाराच्या आत आणि बाहेर सूज येते. अशा स्थितीत या समस्येने पीडित व्यक्तीला अक्षरशः उठता-बसताही प्रचंड वेदना होतात. या आजारावर योग्य वेळी उपचार न केल्यास तो आणखीनच वेदनादायक ठरतो.


अनेकदा लोक मूळव्याध समूळ नष्ट व्हावी म्हणून ऑपरेशनचा मार्ग स्वीकारतात. काहींना या ऑपरेशननंतर देखील फरक पडत नाही. अशावेळी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करून पाहून शकता. या व्याडीवर काही घरगुती उपाय देखील गुणकारी ठरतात. यामुळे रुग्णाला आराम मिळू शकतो. जाणून घ्या उपाय...


मूळव्याधापासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय :


- कोरफडीचे जेल मूळव्याधावर लावल्याने वेदना आणि खाज दोन्हीमध्ये आराम मिळतो.


- मूळव्याधच्या सूजलेल्या भागावर ऑलिव्ह ऑईल लावल्याने देखील सूज काही प्रमाणात कमी होते.


- जिरे पाण्यात मिसळून बारीक वाटून घ्या. आता ही पेस्ट मुळव्याधाच्या भागावर लावा. यामुळे वेदनेपासून आराम मिळेल.


- शिराळ्याचा रस काढून त्यात थोडी हळद आणि कडुलिंबाचे तेल मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती रोज मूळव्याधांवर लावा. असे केल्याने मूळव्याधाची समस्या कमी होईल.


- लिंबाच्या रसात आले आणि मध मिसळून त्याचे सेवन करा. या मिश्रणाने आराम मिळेल.


- मूळव्याधाच्या जागेवर खोबरेल तेल लावल्याने खाज आणि जळजळ कमी होते.


- एक ग्लास ताकात पाव चमचा ओवा पावडर मिसळून जेवणानंतर प्या. याने देखील आराम मिळतो.


- बर्फाचे काही तुकडे कापडात गुंडाळून रोज 10 मिनिटे मूळव्याधाच्या ठिकाणी लावा. याने काही दिवसांत आराम मिळेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :