ginger water: आल्याचं पाणी कोलेस्ट्रॉलसह वेटलॉससाठी फायद्याचं, फक्त उठल्याउठल्या एकच करायचं...
आले हे त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. आयुर्वेदातही अनेक औषधांमध्ये आल्याचा रस वापरला जातो. सर्दी खोकल्यासह कोलेस्ट्रॉल आणि वेटलॉससाठीही आल्याचे पाणी अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
आज-काल बैठ्या जीवनशैलीमुळे तसेच बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यात आल्याने हृदयरोगासह लठ्ठपणाचे प्रमाण वाढलेलं आहे. शारीरिक हालचाल कमी असल्याने दहातल्या सहाजण वेटलॉससाठी प्रयत्न करतात. काहीजण जिममध्ये जातात तर काहीजण संतुलित आहारासह घरगुती काढे पिऊन वेटलॉस करतात. तुमचं कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवायचं असेल तर आल्याचं पाणी हा घरगुती व औषधी उपाय फायद्याचा ठरू शकतो.
आले हे त्याच्या औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. आयुर्वेदातही अनेक औषधांमध्ये आल्याचा रस वापरला जातो. सर्दी खोकल्यासह कोलेस्ट्रॉल आणि वेटलॉससाठीही आल्याचे पाणी अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.
रक्ताभिसरण सुधारेल
आल्याचं पाणी हे अत्यंत औषधी आणि ॲन्टीइन्फ्लमेटरी गुणधर्मांनी भरलं आहे. याचे उठल्याउठल्या सेवन केल्यानं कोलेस्ट्रॉल, नसांना आलेली सूज कमी करणं किंवा यात लसणाऐवजी मध टाकल्यास वेटलॉससाठीही आल्याचा रस फायद्याचा आहे. आल्यातील जिंजरॉल नावाच्या घटकामुळं हृदयाच्या आरोग्यासाठी आलं फायद्याचं आहे. शरिरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतं. यानं रक्तवाहिन्यांमधील साठलेली चरबी कमी होते.
कसं बनवायचं आल्याचं पाणी
आल्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. यातील पोषक घटकांपासून बनवलेल्या पाण्याचे उठल्याउठल्या सेवन केल्यानं पचनाच्या समस्याही कमी होतात. यासाठी आलं घेऊन सर्वात आधी त्याची साल काढा आणि बारीक किसून घ्या किंवा अख्खे आले ठेचून घ्या. एका पातेल्यात २ ते ३ कप पाणी गरम करा आणि त्यात चेचलेले आले त्यात टाका. पाण्याला उकळू द्या. ३ कप पाण्याचे साधारण १.५ कपापर्यंत कमी झालं की त्यात चमचाभर मध घालून रोज सकाळी उपाशीपोटी प्या. दररोज वापरल्यानं हळूहळू तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागेल.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )