Gastric Cancer Warning: जेन झी पिढीला 'या' दुर्धर आजाराचा धोका, 2008 ते 2017 या काळात जन्म झालाय, तर ही बातमी नक्की वाचा
Gastric Cancer Warning: भारतातील तरुण-तरुणींना मोठा धोका. भविष्यात भारतातील अनेकांना कॅन्सरची लागण होण्याचा अंदाज. संशोधन अहवालाने खळबळ. Helicobacter pylori या बॅक्टेरियामुळे कर्करोगाची लागण

Gastric Cancer Warning: भारत आणि चीनमधील जेन झी पिढीतील तरुण-तरुणींना पोटाच्या कर्करोगाचा (Gastric Cancer)मोठ्याप्रमाणावर धोका असल्याची धक्कादायक बाब संशोधनातून समोर आली आहे. या संशोधन अहवालानुसार 2008 ते 2017 या कालावधीत जन्माला आलेल्या जगातील 1.5 कोटी लोकांना भविष्यात पोटाचा कॅन्सर (Gastric Cancer) होऊ शकतो. यामध्ये चीनमधील सर्वाधिक नागरिकांचा समावेश असेल. त्यापाठोपाठ भारतातील तरुण पिढीला पोटाच्या कॅन्सरचा सर्वाधिक धोका आहे. पोटाच्या कर्करोगाचा धोका असलेले 1.5 कोटीपैकी दोन तृतीयांश लोकसंख्या ही आशिया खंडातील असेल. उर्वरित लोक हे अमेरिका आणि आफ्रिका खंडातील असतील, असे या संशोधनात म्हटले आहे. (Health News)
जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगाविषयी संशोधन करणाऱ्या संस्थेच्या विश्लेषणानुसार, 185 देशांमधील सध्या पोटाच्या कर्करोगाच्या आकडेवारीचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार 2008 ते 2017 या काळात जन्म झालेल्या तब्बल दीड कोटी लोकांना भविष्यात कर्करोग होईल. यापैकी 76 टक्के जणांना Helicobacter pylori या बॅक्टेरियामुळे कर्करोगाची लागण होईल. हा बॅक्टेरिया पोटात आढळतो. जगात कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृ्त्यूंमध्ये पोटाच्या कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, योग्य काळजी आणि वैद्यकीय उपचारांमुळे हा धोका कमी होऊ शकतो, असे अभ्यासकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये जगभरातील डॉक्टर्स आणि संशोधकांकडून कर्करोगांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आगामी काळात पोटाच्या कॅन्सरचा वाढणारा धोका या प्रयत्नांना खीळ घालणारा ठरेल. भविष्यात आशिया खंडातील 1.06 नागरिकांना पोटाचा कॅन्सर होईल. यापैकी 6.5 कोटी रुग्ण हे भारत आणि चीनमध्ये असतील, असा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
आणखी वाचा
चेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं; मुंबईतील मन सुन्न करणारी घटना
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )























