Copper Bottles: पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी आहे घातक, हे आहे कारण
तांब्याची बॉटल, स्टील, मातीचं गाडगं आणि प्लास्टिक किंवा कोणत्याही वस्तूमध्ये दीर्घकाळ पाणी भरून ठेवणं घातक असतं. तुम्ही मातीच्या भांड्यात जास्त काळ पाणी भरून ठेवलात, तर त्यामध्ये जंतू तयार होतात.
Copper Bottles: आपण बालपणापासून अनेकवेळा ऐकलेलं आहे की, तांब्याच्या बॉटलमधील पाणी (Water In Copper Bottles) प्यायल्यामुळे आरोग्यावर्धक फायदे मिळतात. हे आपल्या आई-बाबा, आजी-आजोबा किंवा आरोग्याबाबत जागरूक मित्र-मैत्रिणींकडूनही ऐकल आहे. यामुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते. याविषयी आयुर्वेदामध्ये अनेक फायदे असल्याचं सांगितलं आहे. तुम्ही जर नियमितपणे तांब्याच्या बॉटलमधील पाणी पित असाल, तर शरीर अत्यंत एनर्जेटिक राहते. तसेच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यासाठी मदत मिळते.
पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये ठेवून थंड करून पिणे धोक्याचं
तांब्याची बॉटल, स्टील, मातीचं गाडगं आणि प्लास्टिक किंवा कोणत्याही वस्तूमध्ये दीर्घकाळ पाणी भरून ठेवणं घातक असतं. समजा, तुम्ही मातीच्या भांड्यात जास्तकाळ पाणी भरून ठेवलात, तर त्यामध्ये जंतू तयार होतात. त्यामुळे आपल्या सामान्य रूम टेम्परेचरच्या वातावरणात एका भांड्यांत पाणी साठवून ठेवणं चांगलं असतं. त्यामुळे फ्रिजमध्ये तांब्याची बॉटल, स्टील आणि प्लास्टिक यासारख्या बॉटल्स ठेवून थंड पाणी पित असाल तर तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते.
तांब्याच्या बॉटलमधील जास्त पाणी पिणं टाळा
पाण्याने भरलेली तांब्याची बॉटल फ्रिजमध्ये स्टोअर करून पाणी पिणे घातक आहे. कारण साध्या वातावरणाच्या खोलीतील भांड्यात पाणी साठवून ठेवणं चांगलं आहे. तसेच एका दिवसामध्ये फक्त 3 ग्लासपेक्षा जास्त पाणी पिणे टाळा. हे आरोग्याच्या दृष्टीने लक्षात घेणं आवश्यक आहे. याचा अतिरेक केला तर त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच यातील पाणी लवकर गरमही होतं आणि हे पाणी पोटासाठी अत्यंत धोकायदायक असतं.
उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्याच्या दिवसात पाणी पिणं चांगलं
एखाद्या तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी भरून ठेवल्यास त्यात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हे पाणी शुद्ध पाणी बनतं. हे शुद्ध पाणी सकाळी उपाशी पोटी किंवा दुपारी जेवण केल्यानंतर पिणं जास्त फायदेशीर असतं. पण आधी हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, दिवसभरात फक्त 2 ते 3 ग्लासच तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिणे चांगलं असतं. अन्यथा याचा अतिरेक तुमच्या आरोग्यासाठी घातक असतं. याचं कारण सध्या उन्हाळ्याचा काळ सुरू आहे. अशा कडाक्याच्या उन्हात तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पित असाल तर आताचं हे टाळा. त्यापेक्षा हिवाळ्यात तांब्याच्या बॉटलमधील पाणी पिल्यास ते अधिक आरोग्यदायी असतं.
(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )