Diabetes Control : मधुमेह हा असा आजार आहे की त्यावर नियंत्रण न ठेवल्यास शरीरात अनेक आजारांचा धोका वाढू लागतो. चुकीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यामुळे मधुमेहाचा आजार अधिक वाढतो. लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि कौटुंबिक ताणतणावामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
जर तुम्हाला मधुमेह झाला असेल, तर सर्वप्रथम तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे. तरच तुम्ही भविष्यात किडनी, हृदय आणि मज्जातंतूंचे नुकसान यांसारख्या मधुमेहाच्या गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंत टाळू शकता. जर तुम्हाला मधुमेह झाला असेल आणि गोड खाण्याची आवड असेल तर, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करा. जेणेकरून तुम्ही साखरेवर नियंत्रण ठेवू शकता. चला जाणून घेऊयात मधुमेहाच्या रुग्णांनी मिठाई खाल्ल्यास साखर कशी नियंत्रित करावी.
शरीर सक्रिय ठेवा : मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीर सक्रिय ठेवा. शरीर शारीरिकदृष्ट्या सक्रिय असेल तर साखर नियंत्रणात राहते. शरीर सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.
वजन कमी करा : वाढत्या वजनामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तुमचे वजन जास्त असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा. मधुमेहाच्या रुग्णांनी मिठाई खाल्ल्यास त्यांचे वजन आणि साखर झपाट्याने वाढते. वजन कमी करण्यासाठी एरोबिक व्यायाम करा, चाला. थोडक्यात शरीराची हालचाल करा.
प्लांट बेस फूडचे सेवन करा : प्लांट बेस फूड मधुमेह नियंत्रित करते. अनेक अभ्यासानुसार, वनस्पती-आधारित पदार्थ रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या पदार्थांमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या जसे की, पालक, मेथी आणि लौक, कोबी, फ्लॉवर, काकडी, कांदा, भेंडी, टोमॅटो, मशरूम यांसारख्या पिष्टमय नसलेल्या भाज्यांचा वनस्पतींचा आहारात समावेश करा.
सकस आहार घ्या : मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सकस आहार घ्या. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खा. आहारात ब्रोकोली स्प्राउट्स, भोपळ्याच्या बिया, नट आणि फ्लेक्स बिया किंवा फ्लेक्ससीड्सचा समावेश करा.
दालचिनी (Cinnamon) : दालचिनीचा वापर मसाल्यांमध्ये केला जातो. याच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो. दालचिनीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. दररोज अर्धा चमचा दालचिनी पावडर सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :