Health Care Tips : आजकाल लोक आरोग्याची विशेष काळजी घेताना दिसतात. यासाठी लोक चालणं, व्यायाम, योगासनं आणि धावणं या अशा गोष्टींचा अवलंब करतात. मात्र या करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आह, अन्याथा तुम्हाला याचा दुष्परिणाम भोगावा लागू शकतो. तुम्हाला माहिती नसलेल्या काही गोष्टींमुळे तुमच्या निरोगी आयुष्याला हानी पोहोचू शकतो.
तुम्ही चालल्यानंतर घरी आल्यावर अशा काही चुका करतो, ज्याची किंमत तुमच्या शरीराला फेडावी लागू शकते. या चुकांचा परिणाम तुम्हाला त्यावेळी दिसणार नाही तर मात्र काही काळानंतर याचा परिणाम जाणवायला लागेल. जाणून घेऊया अशा काही चुकांबाबत म्हणजे तुम्हाला तुमच्या शरीराची योग्य काळजी घेता येईल.
लगेच काहीही खाऊ किंवा पिऊ नका
चालल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय असते. पण तुमची ही सवय तुमच्या शरीराचं नुकसान करू शकते. म्हणूनच व्यायाम केल्यावर 20-30 मिनिटांच्या नंतरच काही खावे किंवा पियावे.
झोपू नका
चालणे किंवा व्यायाम केल्यानंतर तुमच्या हृदयाची गती वाढते. त्यामुळे आल्यानंतर लगेच झोपू नये. त्यापेक्षा थोडा वेळ बसून घालवावा. यामुळे ह्रदयाची गती साधारण होईल. त्यानंतर तुम्ही काहीही करु शकता.
घामाचे कपडे ताबडतोब बदला
धावल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर संपूर्ण शरीर घामाने भिजते. त्यामुळे आल्यानंतर लगेच हे कपडे बदला. जास्त वेळ ओल्या कपड्यात राहिल्याने शरीरावर ऍलर्जी होऊ शकतो किंवा खोकल्याचा त्रासही होऊ शकतो.
लगेच आंघोळ करू नका
व्यायाम केल्यानंतर लगेच आंघोळ करण्याची चूक कधीही करू नका. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे घाम काही काळ कोरडा निघून जाऊन शरीर कोरडं होऊ द्या. त्यानंतर तुम्ही आंघोळ करू शकता. मात्र यानंतर एसी किंवा कुलरमध्ये बसण्याची चूक करू नका.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :