Health Tips : रोजच्या जीवनात जेवणानंतर आपण काही अशा चूका करतो, ज्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यातील सर्वात पहिली टूक म्हणजे जेवणानंतर अंघोळ करणे. आपल्या रोजच्या जीवनातील अनेक सवयी आहेत, ज्या नकळतपणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. या चुकांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशाच काही सवयींबाबत जाणून घ्या, ज्या तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात.


नाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणे. 
नाश्ता किंवा जेवणानंतर अंघोळ करणे ही सवय, शरीरासाठी घातक ठरु शकते. याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. या चुकीमुळे वजन वाढणे, अपचन, अ‍ॅसिडीटी या आजारांना निमंत्रण मिळेल. यामुळे जेवणानंतर अंघोळ करणाऱ्या व्यक्तींनी लगेचच ही सवय बदला. 


नाश्ता किंवा जेवणानंतर फळं खाणे.
अनेकदा लोक नाश्ता किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच फळं खाताना दिसतात. पण हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवणानंतर लगेचच फळ खाल्याने अ‍ॅसिडीटी होते.


जेवणानंतर धुम्रपान करणे.
काही लोकांना जेवणानंतर धुम्रपान करण्याची सवय असते. पण तुम्हाल माहित नसेल की ही सवय तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे तुमचे वजन वाढते.


जेवणानंतर लगेच झोपणे.
जेवणानंतर लगेच झोपणे ही मोठी चूक आहे. असं केल्यानं खाल्लेलं जेवण पचत नाही. यामुळे अपचनाची समम्या उद्भवते. यामुळे जेवणानंतर काही वेळ चाला.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :