Hepetitis B : आरोग्यसेवा क्षेत्रातील आगाडीची कंपनी अॅबॉटने हेपटायटिस बी विषाणूचे निदान अधिक कार्यक्षम करण्यासाठी भारतात HBsAQ हे नवीन सोल्युशन आणल्याची घोषणा करण्यात आली आहे. या सोल्युशनमुळे रूग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतात. या नवीन चाचणीचे नाव HBsAg Next Qualitative assay असे आहे. हे रक्तातील तसेच पॉप्युलेशन स्क्रिनिंगमधून एचबीव्‍हीचे लवकर आणि अधिक चांगल्या पद्धतीने निदान होण्यास मदत करते. हा जैवरासायनिक तंत्राचा एक नवा प्रकार आहे. परंतु सुरुवातीला हा विषाणू नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. 


हेपटायटिस बी म्हणजे काय ? 


“हेपटायटिस” हा एक यकृताचा आजार आहे. आपल्या शरीरातील यकृत हा एक महत्त्वाचा अवयव आहे. हा आजार तीव्र किंवा दुर्धर स्वरूपाचा असू शकतो. तीव्र आजाराच्या रुग्णांमध्ये यकृत निकामी होणे, यकृताला सूज येणे किंवा यकृताचा कर्करोग अशा गंभीर गुंतागुंती उद्भवण्याची शक्यता असते. विषारी पदार्थांचे सेवन केल्याने, काही औषधांचे सेवन केल्यास हा आजार होऊ शकतो. परंतु, अधिकतर हा आजार संसर्गामुळे होतो. याचे वेळीच निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो. मात्र जर याकडे दुर्लक्ष केले तर हा आजार अधिक गंभीर होऊ शकतो. जगभरातील सुमारे 20 कोटी 96 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत. यापैकी भारतात 10 ते 15 टक्के या आजाराचे प्रमाण आहे. 


या संदर्भात अॅबॉटच्या मेडिकल अफेअर्स, कोअर डायग्नोस्टिक विभागाचे सीनिअर असोसिएट डिरेक्टर डॉ. जगनाथन सिकन म्हणाले, “भारतामध्ये हेपटायटिस बी या आजाराची तपासणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण हा आजार मोठ्या प्रमाणात निदानाविना दुर्लक्षित केला जातो. HBsAg Next Qualitative assay मुळे आता भारतातील लॅबोरेटरीजना एचबीव्‍हीच्या संसर्गाचे निदान लवकर करता येईल."


नवी दिल्लीतील क्लिनिकल व्हायरोलॉजी विभागाच्या प्रा. डॉ. एकता गुप्ता म्हणाल्या, “हेपटायटिस बी चा देशावरील भार लक्षणीय आहे. मात्र, भारतात या आजाराचे निदान कमी असल्यामुळे या आजाराचा फारसा धोका नाही. तपासणीची ही नवी पद्धत आजाराचे लवकर निदान होण्यास मदत करतेच, पण त्याचबरोबर हा विषाणू निदानाविना दुर्लक्षित राहण्याचा धोकाही कमी करते."


हेपटायटिस बी कशामुळे होतो?



  • हेपटायटिस बी हा आजार हेपटायटिस बी या विषाणूमुळे होतो.

  • हेपटायटिस बी विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्त, वीर्य, किंवा इतर सर्वांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचे संक्रमण होते. 

  • हेपटायटिस बी ने ग्रस्त असलेल्या मातेच्या पोटी जन्म झाल्याने हा आजार होऊ शकतो. 

  • हेपटायटिस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीशी असुरक्षितरीत्या शरीरसंबंध ठेवल्यामुळे हा आजार होतो. 

  • हेपटायटिस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या औषधाच्या सुई टोचल्यास हा आजार होतो. 

  • हेपटायटिस बी ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या रक्त किंवा उघड्या जखमांच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :