Cloves for Weight Loss : आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यााचा वापर आजारावर करू शकतो. स्वयंपाकघरातील मसाले हे केवळ जेवणातील चव वाढवत नाहीत तर अनेक आजारांवरही त्यांचा वापर केला जाऊ शकतो. मसाल्यांच्या प्रत्येक पदार्थात एक औषधी गुणधर्म आहे. अशाच प्रकारे आज आपण याच मसाल्याच्या पदार्थांतील लवंगाविषयी जाणून घेणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही पण लवंग हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. चला तर जाणून घेऊयात लवंगाचे फायदे.
वजन कमी करण्यासाठी लवंग फायदेशीर :
तुम्ही लवंगाचा वापर करून तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता. लवंगामुळे तुमचे वजन तर कमी होईलच पण त्याचबरोबर पोटावरची चरबीही कमी होईल. लवंगामध्ये अनेक पोषक तत्व असतात. लवंगाच्या सेवनाने मेटाबॉलिझमला चालना मिळते. यामध्ये अनेक फायबर आढळतात. जसे की, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फोलेट. ज्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर होतो. याच कारणामुळे कंबरेची चरबी हळूहळू कमी होऊ लागते.
लवंगाचा वापर कसा करावा ?
तुमचे वाढते वजन थांबविण्यासाठी लवंग, जिरे आणि दालचिनी समप्रमाणात घेऊन त्याची पावडर बनवा. त्यानंतर एका भांड्यात एक चमचा पावडर घ्या. एक ग्लास पाणी आणि त्यात एक चमचा मध मिसळा. हे मिश्रण गॅसवर ठेवून उकळा. आणि गाळून घ्या. जर तुम्ही हे पेय रोज रिकाम्या पोटी प्यायलात तर काही दिवसांतच तुमच्या कंबरेची चरबी नक्कीच हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :