Coronavirus Research : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. अशातच कोरोना रुप बदलतोय. कोरोना व्हायरसचा आढळून आलेला नवा स्ट्रेन पहिल्यापेक्षा अधिक प्रभावी असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाच्या नवा स्ट्रेनचे शरीराच्या अनेक भागांवर विपरित परिणाम होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात आधी कोरोनाचा प्रभाव फुफ्फुसांवर (Lungs) आणि श्वसनाशी (Respiratory System) निगडीत आजार असणाऱ्या रुग्णांवर होतो. परंतु, त्यानंतर हा व्हायरस शरीराच्या इतर अवयवांनाही आपलं शिकार करत असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे आता  न्यूरोलॉजिकल (Neuro) आणि सायकोलॉजिकल (Psychological) आजारही होत आहेत. याव्यतिरिक्त कोरोनाचा सामना करुन कोरोनामुक्त झाल्यानंतर एंग्जायटी (Anxiety) आणि मूड स्विंग (Mood Swings) च्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. 


कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक लोकांमध्ये मेंदूचे आजार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जर तुमच्या शरीराच्या नसांमध्ये सुन्नपणा आणि विस्मरणासारखी लक्षणं दिसून आली, तर समजून जा की, कोरोना व्हायरसनं तुमच्या मेंदू आणि तंत्रिका तंत्राला प्रभावित करत आहे. याव्यतिरिक्त अनेक सायकोलॉजिकल डिस ऑर्डर यांसारखे मडू स्विंग्स आणि अशक्तपणा यादेखील कोरोनामुळे उद्भवलेल्या समस्या आहेत. अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं आहे की, काही प्रकरणांमध्ये कोरोना व्हायरसमुळं व्यक्तीच्या मेंदूवर आणि नर्वस सिस्टिमवर परिणाम झाला आहे. यामुळे रुग्णांना अनेक गंभीर आजार होत आहेत. ऑक्सफर्डमध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सिद्ध झालं आहे की, कोरोना व्हायरसचा सामना करुन कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. 


कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवू शकतात हे आजार : 


1. एन्सेफॅलोपॅथी किंवा मेंदूचे आजार (Encephalopathy) : कोरोनामुक्त झाल्यानंतर लोकांमध्ये मेंदूचे आजार उद्भवल्याचं दिसून येत आहे. यामध्ये मनोविकृती (Psychosis) आणि स्मरणशक्ती (Memory) कमकुवत  होण्याची शक्यता असते. 


2. इन्सेफेलायटिस (Encephalitis) : कोरोनातून बरं झाल्यानंतर न्सेफेलायटिसची समस्या उद्भवू शकते. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या मेंदूला सूज येते. 


3. रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) : पोस्ट कोविड एक गंभीर समस्या म्हणून सध्या समोर येत आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या मेंदूमध्ये ब्लड क्लॉटिंग होऊ शकते. यामुळे स्ट्रोक होण्याचाही धोका उद्भवतो. अनेक कोरोना रुग्णांमध्ये ही समस्या पाहायला मिळते.  


4. गुलियम बेरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) : यामध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती (Immune) नसांवर हल्ला करते. यामुळे अशक्तपणा, सुन्न पडणं आणि पॅरालिसिसचा धोका वाढतो. 


5. एंग्जायटी (Anxiety) : अनेकांना कोरोनामुक्त झाल्यानंतर मानसिक समस्या उद्भवू लागतात. यामध्ये मूड स्विंग्स आणि एंग्जायटीची समस्यांचा समावेश होतो. 


काय म्हणतं संशोधन? 


कोरोनामुक्त झाल्यानंतर 6 महिन्यांनी 33 टक्के रुग्णांमध्ये मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या दिसून आल्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये श्वासासंबंधित इतर संसर्ग असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मानसिक आणि न्युरोलॉजिकल समस्या होण्याची शक्यता 16 टक्क्यांनी अधिक आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर 2 टक्के लोकांना स्ट्रोक, 0.7 टक्के लोकांना डिमेंशिया, 14 टक्के लोकांना मूड स्विग्स, 5 टक्के लोकांना अनिद्रा, 0.6 टक्के ब्रेन हॅमरेज, 2.1 टक्के इस्केमिक स्ट्रोक, 17 टक्के एंग्जायटी डिसऑर्डरचा सामना करत आहेत. त्यासोबतच 24 टक्के लोक चिंता आणि मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. 


सर्वाधिक धोका कोणाला? 


सर्वाधिक वृद्ध व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती पहिल्यापासूनच हृदय किंवा न्युरोलॉजिकल समस्यांनी ग्रस्त आहेत, त्यांना कोरोनामुक्त झाल्यानंतर अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या व्यक्ती अॅलर्जी, अस्थमा, टीबी किंवा श्वसनाच्या विकारांचा सामना करत आहेत, त्यांच्यावरही कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रभाव दिसून येत आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ज्या व्यक्तींना उपचारादरम्यान आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं किंवा व्हेंटिलेटर लावण्यात आलं होतं. त्यांच्यामध्येही अशा समस्या दिसून आल्या आहेत. 


(टीप : वरील वृत्त वाचकांपर्यंत केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहोत. वरील सर्व बाबी या संशोधनातून समोर आलेल्या आहेत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :