Watermelon : सध्या उन्हाळ्याचे चटके आपण सर्वजण सहन करतोय. या मोसमात लालेलाल टरबूज खाणं ही लोकांची पसंती असते. मात्र टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर काय काळजी घ्यायची याबाबत आम्ही आज आपल्याला सांगणार आहोत. टरबूज आणि खरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, असं अनेकदा सांगितलं जातं. याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. 


टरबुजामध्ये 92 ते 96 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे अगोदरच पाण्याचं एवढं प्रमाण असताना त्यावर आणखी पाणी पिऊ नये, असं तज्ञ सांगतात.

अन्न खाल्ल्यानंतर त्यावर पाणी प्यायल्यास पोटात पाण्याचं अन्नासोबत मिश्रण होतं. शिवाय अन्न चांगल्या प्रकारे पचनही होत नाही.

अन्नासोबत जास्त पाणी प्यायल्यास शरीरात जास्त प्रमाणात अॅसिड तयार होईल आणि पोट भरल्यासारखं वाटेल. त्यामुळे जेवणासोबत जास्त पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र अनेक फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे फळं खाल्ल्यानंतर पाणी पिणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. फळं खाल्ल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यास तुम्हाला जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात.

पाण्याचं प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी प्यायल्यास कॉलरा होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असं होऊ शकतं, असं डॉक्टर सांगतात.

अन्न किंवा फळांवर जास्त पाणी प्यायल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. ज्यामुळे अन्न पचन होण्याऐवजी अन्न आणि पाण्याचं मिश्रण होतं.

उदाहरणार्थ दोन चपात्या घेतल्या आणि त्यावर एक ग्लास पाणी टाकलं. चपाती पाण्यात मिसळून जाईल, मात्र त्याचं व्यवस्थितपणे मिश्रण होणार नाही आणि ते खराब होईल. तसंच पोटाच्या बाबतीतही होतं, जेव्हा आपण जेवणानंतर पाणी पितो, असं उदाहरण डॉक्टर देतात.
जेवणानंतर थोडं थांबून पाणी पिऊ शकतो, कारण पोटाला पचन करण्यासाठी थोडासा वेळ लागतो.

फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणून कुणीही ते खाऊ शकत नाही. किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार ज्यांना असेल, त्यांनी हे फळं खाणं टाळावं, असं डॉक्टर सांगतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha