नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus)इन्फेक्शन वाढण्यापासून रोखण्यासाठी सुरुवातीपासूनच मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आधीपासूनच देण्यात येत आहे. अनेक राज्यांत तसेच काही शहरांत मास्क अनिर्वायही करण्यात आलं आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे. अशातच मास्क वापरण्याचा आणखी एक फायदा समोर आला आहे. एका संशोधनातून दावा करण्यात आला आहे की, मास्क फक्त कोरोना संसर्गापासून बचाव करत नाहीतर मास्क शरीराची रोग प्रतिकारशक्ती (Immunity system) वाढवण्यासाठीही मदत करतं.
मास्क वापरल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याचा दावा करणारं संशोधन 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकल'मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे जॉर्ज डब्ल्यू रदरफोर्ट आणि मोनिका गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फेस मास्क 'वॅरियोलेशन' प्रमाणे काम करू शकतं. त्याचसोबत संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्याचंही काम करतं.
संशोधकांचा दावा आहे की, फेस मास्क ड्रॉपलेट्ससोबत बाहेर येणाऱ्या संसर्गजन्य तत्वांना फिल्टर करू शकतो. शिंकताना किंवा खोकताना मास्कचा वापर केल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात व्हायरस मास्कमधून बाहेर पडतात. त्यांनी सांगितलं की, कांजण्यासारख्या आजारावर लस उपलब्ध होण्याआधी अनेक लोक वॅरियोलेशनचा आधार घेत असतं. यामध्ये ज्या व्यक्ती आजारी पडलेल्या नसतात, त्यांना कांजण्या झालेल्या रुग्णांच्या त्वचेच्या मटेरियलच्या संपर्कात आणलं जात असे. त्यावेळी इन्फेक्शनच्या संर्कात आल्यानंतरही लोक गंभीर स्वरुपात आजारी पडले नव्हते.
'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा
संशोधक कोरोनासाठीही वॅरियोलेशनचा आधार घेण्याचा विचार करत आहेत. ज्यामुळे व्हायरल पॅथोजेनेसिसच्या जुन्या थिअरीवर आधारित आहे. ही थिअरी सांगते की, आजाराचं गांभीर्य व्हायरस इनोक्युलम म्हणजेच, शरीरात प्रवेश करणाऱ्या व्हायरसच्या संक्रमणकारी भागावर अवलंबून असते.
मास्कमुळे संसर्गाचा प्रादुर्भाव कमी
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनाचे आतापर्यंत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. संशोधकांनी अर्जेंटीनाच्या एका क्रूज शिपचं उदाहरणंही दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, क्रूद पॅसेंजर्सना सर्जिकल आणि N95 मास्क दिल्यानंतर 20 टक्के रुग्ण एसिम्प्टोमेटिक आढळून आले होते. तर सामान्य मास्क दिल्यानंतर 81 टक्के लोक एसिम्प्टोमेटिक (asymptomatic) आढळून आले होते. त्यावरून स्पष्ट होतं की, एक चांगला मास्क संसर्गाचा वेग कमी करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनामुक्त झाल्यानंतरही महिलेला पुन्हा कोरोना, भारतात कोरोना रीइन्फेक्शनचं पहिलं प्रकरण
- कोरोनाच्या संकटकाळात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन्सचा ओव्हरडोस घेताय? सावध व्हा
- रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा; लागण झाल्यानंतर नऊ दिवसांनी कोरोना बाधितामुळे संसर्ग होत नाही
- कोरोनाचा संसर्ग झालेल्या आईमुळे बाळालाही कोरोना?, संशोधनातून खुलासा
- लठ्ठ व्यक्तींना कोरोना व्हायरस अधिक धोकादायक; संशोधकांचा दावा
- 'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा
- कोरोना असं बदलतोय आपलं रूप; संशोधकांच्या हाती मोठं यश