मुंबई : कोरोना व्हायरसने अख्ख्या जगाला वेठीस धरलं आहे. या नव्या व्हायरसवर अनेक संशोधन करण्यात येत आहेत. असाच एक संशोधन ब्रिटनमध्ये पार पडलं. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, नऊ दिवसानंतर कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णामुळे संसर्ग होण्याचा धोका कमी असतो. याचाच अर्थ जर एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असेल, तर त्या व्यक्तीमुळे केवळ नऊ दिवसांपर्यंतच इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. हा खुलासा ब्रिटनमधील रुग्णांवर करण्यात आलेल्या संशोधनानंतर करण्यात आला आहे.


रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, नऊ दिवसानंतर व्हायरस शरीरात राहतो. परंतु, त्यामुळे इतरांना संसर्ग होत नाही. नऊ दिवसांनी कोरोना व्हायरसचा कान, नर्वस सिस्टिम आणि हृदयावर परिणाम होतो. परंतु, त्याचा धोका कमी असतो.


17 ते 83 दिवसांमध्ये घशात पोहोचतो व्हायरस


रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर 17 ते 83 दिवसांमध्ये व्हायरस रुग्णाच्या घशात पोहोचतो. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज देण्यासाठी फायदेशीर ठरतील आणि हे निष्कर्ष लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधा पुरवल्यामुळे रुग्णांना अधिक फायदा होईल.


संशोधक मुगे केविक आणि एंटोनिया हो यांचं म्हणणं आहे की, संसर्ग होण्याआधी रुग्णांच्या शरीरात लक्षणं जास्त दिसून येतात. याचा अर्थ आहे की, जोपर्यंत त्यांची चाचणी केली जाते, तोपर्यंत त्यांनी संसर्गाचा सर्वात गंभीर टप्पा पार केलेला असतो. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, त्यामुळे जसं तुम्हाला कोरोनाची लागण झाल्याचं तुमच्या लक्षात येईल त्यावेळी लगेच विलगीकरणात राहणं गरजेचं असतं. लक्षणं नसलेल्या रुग्णांना संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यामुळे इतरांना सर्वाधिक संसर्ग होऊ शकतो.


Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?


कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये दिसून आल्या अंगदुखीच्या समस्या


डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कोरोनामुळे जे रुग्ण आठवडाभरापर्यंत व्हेंटिलेटरवर असतात. त्यांच्यात अशक्तपणा आणि स्नायूंमध्ये वेदना यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याच काळापर्यंत संसर्गाचा सामना करणाऱ्या व्यक्ती आतून अत्यंत अशक्त असतात. ब्रिटनमधील एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, COVID-19 सोबतच आयसीयूमध्ये असणाऱ्या रुग्णांचं एक महत्त्वपूर्ण प्रमाण "एक्सोनल मोनोअनुराइटिस मल्टीप्लेक्स" नावाची एक तंत्रिका विकसित करतं. ज्यामध्ये गंभीर वेदना, असंवेदनशीलता आणि स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांच्या समस्या उद्भवतात. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, आमचा आतापर्यंतच्या अनुभवानुसार, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये यांसारख्या समस्या दिसणं हे सामान्य आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनाचा संसर्ग झालेल्या आईमुळे बाळालाही कोरोना?, संशोधनातून खुलासा


लठ्ठ व्यक्तींना कोरोना व्हायरस अधिक धोकादायक; संशोधकांचा दावा


'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा


कोरोना असं बदलतोय आपलं रूप; संशोधकांच्या हाती मोठं यश