औरंगाबाद : कोरोना संसर्ग कोणाला-कोणापासून, कधी, कसा होईल याबद्दल सतत सगळीकडे तर्क वितर्क केले जात आहेत. यातच सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, नवजात शिशूला आईकडून हा संसर्ग होऊ शकतो का हा प्रश्न आहे. आई जर कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि तिची प्रसूती झाल्यावर सध्या बाळाला वेगळे ठेवल जात आहे. हे योग्य आहे का? शिवाय आईनं बाळाला स्तनपान करावं की नाही? आणि करावं तर कधी? या सगळ्यावर प्रश्नांवर संशोधनाअंती काही उत्तरं मिळाली आहेत.


कोरोनाने आज सगळ्यांच्या मनावर एक भीतीचे सावट निर्माण केले आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत मनात शंका निर्माण होत आहे. त्यातच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला कोरोनाची लागण होते का? हा एक प्रश्न. यावर संशोधनाअंती लॅन्सेट या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित जनरलमध्ये लेख प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये दीड हजार प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काढला गेला आहे की, कोरोनाबाधीत मातेकडून नवजात बाळाला संसर्ग म्हणजे Perinatal Transmission होत नाही. फक्त यासाठी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेतली पाहिजे.


कोरोनाच्या काळात प्रसूत झालेल्या महिलांपासून त्या बाळाला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बाळाला दूर ठेवले जात होतं. मात्र या संशोधनात असं करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. नवजात बाळाला आईचा स्पर्श आणि आईचे दूध शारीरिक तसेच मानसिक विकासासाठी आवश्यक असते. खरे तर त्यानेच बाळांची प्रतिकार क्षमता वाढते आणि अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते. हे संशोधन असं सांगते की, अशा बाळांना आईच्याच खोलीत ठेवणे योग्य आहे.


Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?


कोरोना बाधित मातेने आपल्या बाळाला दूध दिला पाहिजे का? यासंदर्भात आम्ही बालरोगतज्ञ डॉक्टर मंदार देशपांडे यांच्याकडून जाणून घेतलं. मंदार देशपांडे असे म्हणतात की, 'स्तनपान देण्यापूर्वी आणि त्यानंतर आईने हात स्वच्छ करावेत. स्तनपान देताना आईने नाक व तोंड संपूर्ण झाकणारा व्यवस्थित मास्क घालावा, खोकला किंवा शिंक आल्यास बाळापासून तोंड बाजूला करणे अशी खबरदारी घेणं अत्यावश्यक आहे.'


स्तनपानासाठी आईला रुग्णालयातील प्रशिक्षित परिचारिका/ नर्स मदत आणि मार्गदर्शन करू शकते. दुध येण्यात अडथळा असेल तर स्वतःचा ब्रेस्ट पंप ठेवावा. आईने स्वतःचे दुध बाळाला पाजणेच आवश्यक आहे. शक्य न झाल्यास आईचे काढून ठेवलेले दुध द्यावे. ते नसल्यास ह्युमन मिल्क बँकेतील दुध आणि तेही नसल्यास दुधाचे पर्याय द्यावेत. नवजात बाळाला जवळ घेण्याआधी साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने हात निर्जंतुक करावे. प्रत्येक स्तनपानापूर्वी साबण आणि भरपूर पाण्याने स्तन स्वच्छ करावेत, मास्क कायम लावावाच. स्तनपानाने बाळाला संसर्गापासून दूर ठेवता येते.


कोरोना आजार हा वैद्यकीय क्षेत्रा समोर मोठं आव्हान आहे. तसेच या आजारावर कुठलही औषध नसल्याने प्रयोग आणि अभ्यासातून काही माहिती समोर येत आहे आणि त्यातून यासंदर्भात निष्कर्ष काढले जात आहेत. त्यातून समोर आलेलं सत्य म्हणजे, कोरोना बाधित गर्भवती महिलेमुळे तिच्या बाळाला कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


लठ्ठ व्यक्तींना कोरोना व्हायरस अधिक धोकादायक; संशोधकांचा दावा


'हा' रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून खुलासा


कोरोना असं बदलतोय आपलं रूप; संशोधकांच्या हाती मोठं यश


Work From Home | जास्त वेळ बसणे आरोग्यास हानिकारक; कॅन्सर, हृदयरोगाचा धोका


हँड सॅनिटायझरचा अतिवापर धोकादायक, आरोग्य विभागचा इशारा