मुंबई : कोरोनाच्या संकटकाळात जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला देत आहेत. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अनेक लोग व्हिटॅमिन्सच्या सप्लिमेट्स आणि गोळ्यांचं सेवन करत आहेत. व्हिटॅमिन्समुळे कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणं शक्य होतं. परंतु, व्हिटॅमिन्सच्या ओव्हरडोस शरीरासाठी अत्यंत घातक ठरतो.


व्हिटॅमिन ए


हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याच्या सेवनाने डोळ्यांच्या नसांमध्ये फॅट्स जमा होत नाही आणि पेशींचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. परंतु, हे अॅन्टीऑक्सिडंट्सप्रमाणेही काम करतं. जर एखादी व्यक्ती आहारामार्फत व्हिटॅमिन्सचं सेवन करत असेल तर, ते अत्यंत लाभदायक ठरतं. पण जर सप्लिमेंट्स घेत असेल तर मात्र डोळ्यांसाठी घातक ठरू शकतं.


व्हिटॅमिन सी


व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी मदत करते. अनेक फळांमार्फत शरीरात व्हिटॅमिन सी पोहोचवण्यासाठी मदत होते. परंतु, कोरोना काळात अनेक लोक औषधांमार्फत किंवा सप्लिमेंट्समार्फत सेवन करत आहेत. त्यामुळे पोटाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उल्टी, जुलाब यांसारख्या समस्या व्हिटॅमिन सीच्या अधिक सेवनाने उद्भवण्याची शक्यता आहे.


व्हिटॅमिन डी


व्हिटॅमिन डी जर कोणी सप्लिमेंट्समार्फत घेत असेल, तर व्यक्तीला स्नायूंच्या समस्या उद्भवतात. स्नायूंमध्ये वेदना होणं, किडनी स्टोन यांसारख्या समस्या होतात. व्हिटॅमिन डी नेहमी डॉक्टर्सच्या सल्ल्याने घ्यावं. अन्यथा ओवरडोसमुळे शरीराला नुकसान पोहोचू शकतं.


दरम्यान, जगभरात कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने हातपाय पसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती याबाबत सगळीकडे चर्चा होताना दिसत आहेत. याचं कारणही कोरोना व्हायरसच आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा सल्ला वारंवार जागतिक आरोग्य संघटना आणि डॉक्टरांच्या वतीने केला जात आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांसोबतच डॉक्टर्सही देत आहेत. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर वारंवार 'व्हिटॅमिन सी' (Vitamin C) असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.


(टिप : वरील बाबी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय

Coronavirus | एकदा संसर्ग झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?


लॉकडाऊनदरम्यान मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी?, तज्ज्ञांचं मार्गदर्शन