Calcium For Health : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी बहुतेक लोक आहारात दूध, दही आणि चीजचे सेवन करतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होत असतात. पण काही लोक दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. पण दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.
तीळ - हिवाळ्यात तीळ खूप फायदेशीर आहे. तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. एक टेबलस्पून तिळात सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. सूप, तृणधान्ये किंवा सॅलडमध्ये तीळ घालून त्याचा वापर करता येतो. हिवाळ्यात तिळाचे लाडूदेखील फायदेशीर असतात.
आवळा - आवळ्यातदेखील भरपूर कॅल्शिअम असते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आवळा ज्यूस किंवा पावडरच्या स्वरूपातही खाऊ शकता.
जिरे - जिरे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जिरे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी उकळा त्यात 1 टीस्पून जिरे घाला. पाणी थंड करून दिवसातून किमान दोनदा प्या.
नाचणी - नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. खीर किंवा भाकरी बनवून खाऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
संबंधित बातम्या
Snake Bite Tip: सर्प दंशानंतर ही कामे चुकूनही करू नका; अशी काळजी घ्या
Diabetes Control : मुळा, काकडी, टोमॅटोच्या रसाने हिवाळ्यात रक्तातील साखर नियंत्रित करा, दीर्घकाळ राहाल निरोगी
तुम्हाला नंबरचा चष्मा आहे? नंबर कमी करण्याचे 'हे' उपाय करुन बघा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha