Vegetable Juice In Diabetes : आजकाल बहुतेक लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. तुमच्या आहाराचा रक्तातील साखरेवर चांगला परिणाम होतो. आहारामुळे साखरेची पातळी वर-खाली होत राहते, जी नियंत्रित करणे मोठे आव्हान बनते. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारची औषधे घेतात, त्याऐवजी तुम्ही काही गोष्टींचा आहारात समावेश करू शकता ज्यामुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होईल. मधुमेहाच्या रुग्णांनी भाज्यांचा रस जरूर प्यावा. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.


काकडीचा रस - उन्हाळा असो वा हिवाळा सर्व ऋतूत लोक काकडी खातात. मधुमेहाच्या रुग्णाने काकडीचा रस जरूर प्यावा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. काकडीमध्ये भरपूर फायबर आणि पोटॅशियम असते, जे नैसर्गिकरित्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढवते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.


टोमॅटोचा रस - मधुमेहाच्या रुग्णानेही टोमॅटोचा रस प्यावा. टोमॅटोचा रस पिण्यास अतिशय चवदार असतो. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट घटक असतात, ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर बनते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. यामध्ये आढळणारे प्युरीन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.


मुळा आणि त्याच्या पानांचा रस - मुळा हिवाळ्यात भरपूर येतो. मधुमेहाच्या रुग्णाने मुळ्याचे सेवन करावे. मुळा आणि त्याच्या पानांचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्याने पचनक्रियाही चांगली राहते.


कारल्याचा रस - कारल्याचा रस प्यायला खूप कडू असला तरी त्याचे अनेक फायदे आहेत. कारल्याचा रस रोज प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. कारल्यामध्ये भरपूर पोषक असतात, त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, रिबोफ्लेविन आणि थायामिन सारखे पोषण असते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha