Snake Bites Salman Khan :  बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पनवेलच्या फार्म हाऊसवर सापाने दंश केला होता. सापाने दंश केल्यानंतर सलमान खान याच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात  उपचार करण्यात आले. सलमान खानला एकदा नव्हे तर तीनदा सापाने दंश केला. या घडलेल्या घटनेबाबत सलमान खानने माध्यमांना सांगितले. सलमानला चावलेला साप हा बिनविषारी होता. पण जर विषारीसाप चावला तर विशेष काळजी घ्यावी लागते. साप चावल्यानंतर लगेच रूग्णालयात उपचार घ्यावेत.  साप चावल्यानंतर कशी काळजी घ्यायची त्याबद्दल जाणून घेऊयात...
 
साप चावल्यानंतर या गोष्टी चुकूनही करू नका 
1. साप ज्या ठिकाणी चावला आहे त्या ठिकाणी चुकूनही बर्फ किंवा गरम पाणी लावू नका.  
2.साप चावल्यानंतर त्या ठिकाणी कपडा बंधू नका.
3. साप चावल्यानंतर जास्त चालू नका.
4. साप चावलेल्या व्यक्तीला झोपू देऊ नये. 


5. साप चावलेल्या व्यक्तीने शरीर स्थिर ठेवावे. जास्त हालचाल करू नका. 


या गोष्टींची घ्या विशेष काळजी-
1. ज्या व्यक्तीला साप चावला आहे, त्या व्यक्तीच्या हातातील घड्याळ, पैजण या गोष्टी काढून बाजूला ठेवा. 
2.  साप चावलेल्या व्यक्तीने घाबरू नये, त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते आणि शरीरात विष वेगाने पसरवू शकते.
3. शरीराच्या ज्या भागात साप चावला आहे, तो भाग साबणाने धुवा
4. लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या.
 
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha