मुंबई : तुम्हाला चष्मा असेल, तर अनेकवेळा तो इतरांच्या चेष्टेचा विषय ठरतो. अगदी चष्मीष, बॅटरी असं म्हणण्यापासून स्कॉलरपर्यंत अनेक ठपके तुम्हाला लावले जातात. चष्मा सांभाळायचा, न विसरता सोबत न्यायचा त्रास वेगळाच. चष्म्यामुळे नाकावर पडणारे डागही तुमच्यासाठी नवीन नसतील. त्यामुळे डोळ्यांचा नंबर कमी करणारे काही उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील.   


1. रोज रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. 


2. गाजरामध्ये अ, ब आणि क जीवनसत्त्व असतं. त्यामुळे रोज गाजर खाल्ल्यास किंवा त्याचा ज्युस प्यायल्यास नजर तीक्षण होते.


3. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत. 


4. रोज रात्री झोपताना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी 


5. एक चमचा बडीशेप (सौफ), दोन बदाम आणि अर्धा चमचा साखर एकत्रित करुन वाटून घ्यावं. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे 


6. 3-4 हिरव्या वेलच्या, एक चमचा बडीशेप (सौफ) सोबत वाटून घ्याव्या. हे वाटण रोज रात्री झोपताना दुधासोबत घ्यावे 


7. ग्रीन टी दिवसातून रोज 2 ते 3 वेळा प्यावा, यातील अॅन्टीऑक्सिडेंटस डोळ्यांना आरोग्य प्रदान करतात. 


8. दिवसातून दोनवेळा मोरावळा (आवळ्याचा मुरंबा) खावा, याने नजर चांगली होते. 


9. रोज एक चमचा ज्येष्ठमध पावडर, मध आणि अर्धा चमचा तूप एकत्रित करुन सकाळ-संध्याकाळ दुधासोबत घ्यावं 


10. डोळ्याच्या चारही बाजूंनी अक्रोडाच्या तेलाने मालिश करावी, त्यामुळे फायदा होतो 


11. रोज सकाळी 1 ते 2 किलोमीटर अंतर हिरव्यागार गवतावर अनवाणी चालावे, त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो 


12. रोज रात्री तांब्याच्या भांड्यांमध्ये पाणी भरुन ठेवावे आणि सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास पाणी अनोशा (रिकाम्या) पोटी प्यावे 


13. रोजच्या आहारात हिरव्यागार पालेभाज्या खाव्यात, डोळ्यांना फायदा होतो


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





संबंधित बातम्या


जेवल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय आहे? तर सावधान!


Swiggy report : 2021 मध्ये 'या' डिशला देशाची पसंती; मुंबईकरांनी अन् पुणेकरांनी कशावर मारला सर्वाधिक ताव


Weight Gain Food : दूध, केळी अन् तूप; वजन वाढवण्यासाठी आहारात करा 'या' 10 गोष्टींचा समावेश