Health Tips : हिवाळ्यात 'या' पॉवरफुल फूड कॉम्बिनेशनची सवय लावा; अनेक आजारांपासून दूर राहाल
Health Tips : एवोकॅडो हा स्वतःच पोषणाचा एक उत्तम खजिना आहे. टोमॅटोबरोबर एवोकॅडो खाल्ल्याने तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात.

Health Tips : आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक पदार्थ आहेत जे त्यांच्या स्वत:च्या गुणधर्मांसाठी ओळखले जातात. पण, याच गोष्टींचं इतर काही गोष्टींबरोबर एकत्र करणं यालाच म्हणतात फूड कॉम्बिनेशन (Food Combination). अनेकदा हे फूड कॉम्बिनेशन फसतात, पण, जर तुम्ही याचा आरोग्याच्या (Health) दृष्टीने विचार केला तर यापासून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात,
याच संदर्भात, पोषणतज्ञ अपूर्व अग्रवाल यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी हेल्दी फूड कॉम्बिनेशनचा उल्लेख केला आहे. चला जाणून घेऊयात कोणते पदार्थ एकत्र खाणे फायदेशीर ठरू शकते.
1. टोमॅटो आणि एवोकॅडो
एवोकॅडो हा स्वतःच पोषणाचा एक उत्तम खजिना आहे. टोमॅटोबरोबर एवोकॅडो खाल्ल्याने तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात. अपूर्व अग्रवाल यांच्या मते, एवोकॅडो आणि टोमॅटो एकत्र खाल्ल्याने कॅन्सरशी लढण्यास मदत होते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने चव तर वाढतेच पण तुम्ही तंदुरुस्तदेखील राहता.
2. सफरचंद आणि डार्क चॉकलेट
सफरचंद आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे सांगण्याची गरजच नाही. सफरचंदात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात आणि डार्क चॉकलेट पॉवरफुल अँटिऑक्सिडंट्सचा खजिना मानला जातो. हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने तुमचे रक्ताभिसरणही सुधारते. त्याची उत्तम चव चाखण्यासाठी, सर्वात आधी डार्क चॉकलेट वितळवा. यानंतर सफरचंदाचे तुकडे त्यात डीप करून खा. या फूड कॉम्बिनेशनसाठी तुमचं डार्क चॉकलेट चांगल्या क्वालिटीचं असणं गरजेचं आहे.
3. लिंबू सह ग्रीन टी
आपण सर्वांनी ग्रीन टीचे एकच नाही तर अनेक फायदे ऐकले आहेत आणि या फायद्यांसाठी जवळपास प्रत्येकाने आपल्या दैनंदिन दिनचर्येत ग्रीन टीचा समावेश केला असेल. पण लिंबू मिक्स करून ग्रीन टी पिणे तुमच्यासाठी थोडं आश्चर्यकारक असेल. खरंतर, ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात आणि लिंबूमध्ये मिक्स केल्यानंतर हे फायदे दुप्पट होतात.
4. बीट आणि चणे
बीट आणि उकडलेले चणे तुम्ही सॅलडमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून खाऊ शकता. चण्यात व्हिटॅमिन बी6 मुबलक प्रमाणात आढळते, जे बीटबरोबर खाल्ल्यास शरीराला अधिक पोषण मिळते. त्यामुळे हे फूड कॉम्बिनेशन देखील हेल्दी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.























