Covid-19 : स्वयंपाकघरात असलेल्या 'या' गोष्टी ओमायक्रॉन व्हेरियंटला दूर ठेवतील, प्रतिकारशक्ती होईल मजबूत
Health Tips : ओमायक्रॉनला टाळण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी स्वयंपाकघरातल्या अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन केल्याने तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.
Omicron Variant : कोरोना व्हायरसचे (Coronavirus) सावट पुन्हा एकदा संपूर्ण जगावर आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron Variant) वेगाने पसरत आहे. लसीकरण झालेल्या लोकांवर या आजाराचा फारसा गंभीर परिणाम होत नाही असे तज्ञांनी म्हटलं आहे. या दरम्यान, तुम्हाला नेहमी मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे आणि सामाजिक अंतर पाळणे यांसारख्या सुरक्षा उपायांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. त्याचबरोबर शरीराला आतून मजबूत करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला हा संसर्ग होणार नाही. ओमायक्रॉनला टाळण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन केल्याने तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.
अद्रक (Ginger)
अद्रक हे प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात अगदी सहज उपलब्ध असते. आल्यामध्ये अँटी-मायक्रोबियल, अँटीबायोटिक सारखे गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्यासाठी अद्रक दुधात मिसळून त्याचे सेवन केले जाऊ शकते.
काळी मिरी (Black Pepper)
काळ्या मिरीमध्ये औषधी गुणधर्म असतात. काळ्या मिरीच्या सेवनाने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर होते. जर तुम्ही रोज काळी मिरी खात असाल तर ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. यासाठी तुम्ही ते बारीक करून मध आणि काळे मीठ घालून खाऊ शकता. त्याच वेळी, तुम्ही त्याची पावडर चहामध्ये मिसळून देखील पिऊ शकता. हेच फळ आणि सॅलडमध्येही खाऊ शकता.
दालचिनी (Cinnamon)
दालचिनी हा भारतीय जेवणात आढळणाऱ्या प्रमुख मसाल्यांपैकी एक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अन्नातील चवीनुसार दालचिनी देखील खूप उपयुक्त आहे. हिवाळ्यात येणाऱ्या विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दालचिनीचे सेवन केले जाऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care Tips: Drink this drink to boost your immune system, it will prevent corona
- Omicron Variant: 5 वर्षांखालील मुलांना होतेय ओमायक्रॉनची लागण, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
- Omicron : ओमायक्रॉनची सौम्य लक्षणे दिसताच स्वतःला असं करा होमक्वारंटाईन, 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )