Health Tips : हिवाळ्यात जास्त गरम मसाला वापरणे फायदेशीर की हानिकारक? जाणून घ्या
Health Tips : गरम मसाला शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो.
Health Tips : आपल्या रोजच्या जेवणात मसाल्यांचा (Spices) अगदी पुरेपूर वापर केला जातो. हे मसाले आपल्या जेवणाची चव वाढवतात. अनेकज तर कित्येक वर्ष मसाले साठवून ठेवतात. पण, हिवाळ्यात (Winter Season) गरम मसाले वापरणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहे का? हिवाळ्यात गरम मसाला कसा वापरायचा? हेच आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हिवाळ्यात गरम मसाला खाण्याचे अनेक फायदे आहेत. गरम मसाल्यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती असतात. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. गरम मसाला शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी दोन्ही घटक आढळतात. ज्यामुळे शरीरातील वेदना कमी होतात. हिवाळ्यात तुम्ही गरम मसाला अनेक प्रकारे खाऊ शकता. त्याचे फायदे जाणून घेण्यापूर्वी जाणून घेऊयात ते कसे बनवले जातात?
गरम मसाल्यात 'या' गोष्टींचा समावेश करतात
- संपूर्ण धणे
- जीरे
- हिरवी वेलची
- मोठी वेलची
- दालचिनी
- लवंग
- बडीशेप
- स्टारफूल
- जायफळ
गरम मसाल्याचे फायदे
प्रतिकारशक्ती वाढवतात
गरम मसाला हा एक प्रकारची प्रतिकारशक्ती वाढवणारा आहे. हे अनेक आजारांपासून बचाव करण्याचे काम करते. हे खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. श्लेष्मा वितळण्यासाठी आणि खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.
शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्याचे काम करते
गरम मसाला शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्याचे काम करतो. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम देतात. यामुळे हाडे निरोगी होतात आणि सांधेदुखी दूर होते.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
गरम मसाला पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर आहे. हा मसाला पोट निरोगी ठेवतो तसेच चयापचय क्रिया गतिमान करतो. हिवाळ्यात गरम मसाला खाल्ल्याने शरीर उबदार राहते. गरम मसाला शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्याचे काम करतो. यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम देतात. यामुळे हाडे निरोगी होतात आणि सांधेदुखी दूर होते. तसेच, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी हिवाळ्यात गरम मसाल्यांचं सेवन करावं.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.