Health Tips : हिवाळ्यात सायनसची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते; आराम मिळवण्यासाठी वाचा नैसर्गिक उपाय
Health Tips : अंटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले आलं सायनसमध्ये आणि सायनस टाळण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.
Health Tips : हिवाळ्यात (Winter Season) नाक बंद होणे, डोकेदुखी, डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना होणे आणि नाकातून जास्त स्त्राव होणे ही सायनसची (Sinus) लक्षणे आहेत. ज्यामध्ये रक्तसंचय वाढल्याने नाकात जळजळ होते. याबरोबरच पापण्यांच्या काठावर दुखणे, सौम्य ताप येणे, तणाव, नैराश्य आणि चेहऱ्यावर सूज येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत धूळ आणि धूर समस्या आणखी वाढवू शकतात. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे पुढे अस्थमासारख्या गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते.
जर नीट निरीक्षण केल्यास, सायनस संसर्गामध्ये सायनसच्या पडद्याला सूज येते, ज्यामुळे त्यात हवेऐवजी पू आणि कफ जमा होतो. यामुळे आपले सायनस ब्लॉक होतात आणि त्यामुळे संपूर्ण चेहरा आणि डोक्यात तीव्र वेदना होऊ लागतात. सायनसची मुख्य कारणे म्हणजे थंडी, नाकाची हाडे वाढणे किंवा वक्र होणे, प्रदूषण, ऍलर्जी, अनहेल्दी जीवनशैली, आपला आहार आणि हिवाळ्यातील थंड वारे. चला तर मग जाणून घेऊयात सायनसच्या समस्या टाळण्याचे काही सोपे उपाय.
- अंटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले आलं सायनसमध्ये आणि सायनस टाळण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. इतकंच नाही तर त्यात अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म देखील भरपूर आहेत, ज्यामुळे नाक बंद होण्यापासून आराम मिळतो आणि सायनुसायटिसपासून बचाव होतो.
- आल्याचे चार ते पाच तुकडे पाण्यात उकळून हे पेय दिवसातून दोनदा प्यायल्याने सायनसपासून आराम मिळतो. यामध्ये असलेले अँटीबायोटिक्स सर्दी किंवा सायनसच्या दुखण्यापासून आराम देतात. त्यामुळे हिवाळ्यात रोज तयार केलेला त्याचा डेकोक्शन तुम्हाला आतून उबदार ठेवण्यास मदत करतो.
- कांदा आणि लसूण दोन्ही समप्रमाणात एका भांड्यात पाण्यात उकळून दहा मिनिटे वाफवून घ्या. यामुळे सायनसच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
- हिवाळा असो किंवा उन्हाळा असो स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. हायड्रेटेड नसणे हे देखील अनेक रोगांचे मूळ आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे.
- एक चमचा कच्च्या हळदीची पेस्ट आणि एक कप दूध गरम करून त्यात मध टाकून प्यायल्याने सायनसपासून आराम मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.