एक्स्प्लोर

Health Tips : रोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिणे योग्य आहे का? त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

Health Tips : ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी घ्यावे.

Health Tips : ड्रायफ्रूट्स (Dry Fruits) आपल्या शरीराला खूप फायदे देतात. याच ड्रायफ्रूट्सपैकी मनुका (Raisin) हा देखील शरीरासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. गोड पदार्थात मनुका वापरल्याने त्या पदार्थाची चव तर वाढतेच पण शरीराला पोषणही मिळते. मनुका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तर आहेच, पण मनुक्याचं पाणीही आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. हे पाणी रोज प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊयात मनुक्याच्या पाण्याचे फायदे. 

मनुक्याच्या पाण्याचे फायदे 

मनुक्यामध्ये अल्कधर्मी जास्त प्रमाणात असते. जे शरीरात तयार होणार्‍या ऍसिडवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. हे खाल्ल्यानंतर अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते. 

मनुक्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे मनुक्याला इम्युनिटी बूस्टर असेही म्हणतात. 

ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मनुक्याचे पाणी प्यावे. मनुक्याच्या पाण्यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात राहतो.

ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी घ्यावे. कारण त्यात भरपूर लोह असते. त्यामुळे चेहऱ्याचा ग्लो देखील वाढतो. 

मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केस आणि त्वचा चांगली होते. निरोगी त्वचा आणि केसांसाठी, दररोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यावे. 

मनुक्याच्या पाण्याचे तोटे

मनुक्याचे पाणी जास्त प्यायल्याने डायरिया आणि गॅसची समस्या होऊ शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी मनुके विचारपूर्वक खावे. कारण त्यामुळे टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात. 

मनुक्याचे पाणी काही लोकांसाठी फायदेशीर नसेल तर त्यांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. 

मनुक्याचे पाणी बनवण्याची आणि पिण्याची पद्धत

पाणी - 200 मिली

मनुका - 80 ते 90 ग्रॅम

एका भांड्यात पाणी उकळा आणि नंतर त्या गरम पाण्यात मनुका रात्रभर भिजवा. 

सकाळी मनुके काढून बाजूला ठेवा आणि नंतर पाणी हलके गरम करा. नंतर काही वेळाने ते प्या. 

रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्या. हे पाणी शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम करते. हा घरगुती उपाय तुमच्या उपयोगी येईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

महत्त्वाच्या बातम्या

Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
Child Health: शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...
शाळा, प्रवासात टाईप - 1 मधुमेही मुलांची काळजी कशी घ्याल? किशोरवयीन मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा आजार, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Embed widget