Health Tips : तुम्ही झोपेत तोंडातून श्वास घेत असाल तर काळजी घ्या; ही सवय आरोग्यासाठी धोकादायक
Health Tips : काही लोक रात्री झोपताना तोंडातून श्वास घेतात. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.

Health Tips : आपल्यापैकी अनेकांना झोपताना तोंड उघडं ठेवून श्वास घेण्याची सवय आहे. जर तुम्हीसुद्धा रात्री झोपताना तोंडातून श्वास घेत असाल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ही सवय आरोग्यासाठी (Health) अत्यंत घातक आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की जर तुम्ही नाकाच्या ऐवजी तोंडाने श्वास घेत असाल तर यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तोंडाने श्वास घेतल्याने आपले कोणते नुकसान होते हे जाणून घेऊयात.
जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला श्वास घेणं गरजेचं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की तुमच्या श्वास घेण्याच्या पद्धतीवरून तुमची प्रकृती चांगली आहे की नाही हे देखील ठरवता येते. फुफ्फुसात ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचविण्याचे दोन मार्ग आहेत, एक नाकातून आणि दुसरा तोंडातून. बहुतेक लोक नाकातून श्वास घेतात. तर, काही लोक तोंडातून श्वास घेतात.
काही लोक रात्री झोपताना तोंडातून श्वास घेतात. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. तोंडाने श्वास घेतल्याने अनेक रोग होऊ शकतात. तोंडाने श्वास घेताना कोणकोणत्या समस्या जाणवतात हे जाणून घेऊयात. तसेच हे आरोग्यासाठी का हानिकारक आहे हे देखील जाणून घेऊयात.
तोंडाने श्वास घेण्याचे कारण :
- झोपेत श्वसनक्रिया बंद होणे
- नाक बंद होणे
- वाढलेले टॉन्सिल
- तणाव जाणवणे
- खूप थकवा येणे
तोंडाने श्वास घेणे धोकादायक का मानले जाते?
- जेव्हा आपण नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतो तेव्हा हवा फिल्टर न होता थेट आपल्या शरीरात जाते. यामुळे जास्त श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
- तोंडातून श्वास घेतल्याने रक्तातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे रक्तातील PH पातळी बिघडू लागते.
- नाकाच्या विपरीत, तोंडात कोणतीही संरक्षण यंत्रणा नसते. नाकातून श्वास घेतल्याने सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार लवकर बरे होतात.
- वर्कआउट करताना तोंडातून श्वास घेतल्यास वजन कमी करण्यात अडचण येऊ शकते.
- फुफ्फुसात ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत, एक नाकातून आणि दुसरा तोंडातून. बहुतेक लोक नाकातून श्वास घेतात, परंतु काही लोक तोंडातून श्वास घेतात.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.























