Health Tips  :  अंघोळ केल्यानंतर आपला थकवा दूर होतो आणि फ्रेशनेस येतो. त्यामुळं दिवसाची सुरुवात आपण अंघोळीनं करतो. आजही अनेकजण पहाटे अंघोळ करुन आपली दिनचर्या सुरु करतात. काहींना गरम पाण्यानं अंघोळीची सवय असते तर काही जण थंड पाण्यानं अंघोळ करतात. गरम ऐवजी थंड पाण्यानं अंघोळ केल्यानं आपल्याला अनेक फायदे आहेत. आपण आपण थंड पाण्यानं अंघोळ करण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. 


 वजन कमी करणं ही एक मोठी आणि दमवणारी प्रक्रिया आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काही जण डाएटिंगचा आधार घेतात तर काही जॉगिंगला जातात. काही लोक योग करतात. पण न धावता आणि डाएटिंग न करताही तुम्ही वजन कमी करु शकता. थंड पाण्याने आंघोळ करुन तुम्ही वजन घटवू शकता.   तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने वजन कमी होतं.  


ही पूर्णत: वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरात व्हाईट फॅट आणि ब्राऊन फॅट असे दोन प्रकारचे फॅट असतात. व्हाईट फॅटची तशी आवश्यकता नसते. शरीरात प्रमाणापेक्षा अधिक कॅलरी निर्माण होते आणि हे फॅट बर्न होत नाही, तेव्हा हे फॅट जमा होतं. हे व्हाईट फॅट कंबर, पाठीचा खालचा भाग, मान आणि जांघांमध्ये जमा होतं.   


तर ब्राऊन फॅट शरीरासाठी चांगलं असतं. हे फॅट हीट जनरेट करण्याचं काम करतं, ज्यामुळे आपलं शरीर उष्ण राहतं. आपल्याला जेव्हा थंडी वाजते, तेव्हा ब्राऊन फॅट सक्रीय होतं. जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ करत, तेव्हा हे फॅट वेगाने वितळायला सुरुवात होते. याचा सरळ अर्थ म्हणजे तुमची वाढलेली चरबी कमी होते.   


थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्ताभिसरण वाढतं. ज्यामुळे चरबी वितळते. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्तीही सुधारते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणावही कमी होतो. 


जर तुम्हाला डिप्रेशनचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरेल.  थंड पाण्याने आंघोळ केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते.  थंड पाण्याने आंघोळ केल्यास तुमचे केस आणि त्वचा चमकदार होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :