Horoscope Today, 19 May, 2022 : आज मूल नक्षत्र आहे. चंद्र धनु राशीत आहे. शनि आज कुंभ राशीत आहे. गुरु मीन राशीत आहे. तर, सूर्य वृषभ राशीत आहे. कर्क, सिंह राशीच्या लोकांची आज व्यवसायात चांगली प्रगती होणार आहे. मकर राशीच्या लोकांना काळजीपूर्वक गुंतवणूक करावी लागणार आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...


मेष (Aries Horoscope) : व्यावसायिकांना जास्त मेहनत करावी लागेल. कामाच्या दर्जाकडे खूप लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्थिती सकारात्मक ठेवा. काही लोक तुमच्या सवयींवर टीका करू शकतात. कुटुंबात धार्मिक कार्ये होतील. घराच्या देखभालीचा खर्च वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शत्रूंवर सहज विजय मिळवाल. खूप मेहनत करावी लागेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. काही प्रलंबित कामे पूर्ण होतील.


वृषभ (Taurus Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्ततेचा असेल. तुमचे रखडलेले काम आज पूर्ण होईल. स्वतःच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. महत्त्वाचे निर्णय घेताना गाफील राहू नका. कामाच्या ठिकाणी सर्व कामे स्वतःच्या जबाबदारीने करा. नोकरीत कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कार्यात अडचणी येऊ शकतात. संवाद साधणे लाभदायक ठरेल.


मिथुन (Gemini Horoscope) : व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. भूतकाळात केलेल्या मेहनतीचा तुम्हाला लाभ मिळेल. आर्थिक समस्यांमुळे थोडी चिंता करावी लागेल. ऑफिसमध्ये लोक तुम्हाला खूप सहकार्य करतील. व्यावसायिकांचे उत्पन्न वाढू शकते.


कर्क (Cancer Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले निकाल मिळतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला बढती किंवा पगारवाढ यांसारखी कोणतीही आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते. अनोळखी लोकांपासून सावध रहा. सहकाऱ्यांच्या सहकार्याने तुमची कामे लवकर पूर्ण होतील. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात.


सिंह (Leo Horoscope) : व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश देईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. मजबुरीने काही कामे करावी लागतील. करिअरशी संबंधित चांगली माहिती मिळेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल. नोकरीत अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतात.


कन्या (Virgo Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. मित्रांसोबत सहलीला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी कोणतीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली, तरी तुम्हाला त्यात संयम बाळगावा लागेल. आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. व्यवसायाशी संबंधित अधिक कामामुळे थकवा जाणवेल. लोक गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेण्याचा प्रयत्न करतील. खर्च मर्यादित आणि संतुलित ठेवा. धार्मिक कार्यात रुची वाढेल.


तूळ (Libra Horoscope) : व्यवसायात अडचणी येऊ शकतात. पालकांचे सहकार्य मिळेल. खर्च जास्त होईल. सामाजिक क्षेत्राशी निगडित लोकांना मान-सन्मान मिळेल. अर्थविषयक कामातील गुंतागुंत दूर होईल. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधानाची भावना वाढेल. नोकरीत तुमची प्रगती होईल. मनापासून इतरांचा चांगला विचार कराल आणि इतरांची सेवा कराल.


वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुमचे मन काहीसे अस्वस्थ असेल, त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. व्यवसायात लाभ मिळेल. लघुउद्योग करणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात खूप सक्रिय असणार आहेत. आपल्या स्वार्थासाठी कोणताही चुकीचा मार्ग निवडू नका. निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका.


धनु (Sagittarius Horoscope) : नोकरीत पदोन्नती होऊ शकते. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आज सहज उपलब्ध असेल. छोट्या-छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू शकता. आत्मविश्वास वाढेल, परंतु अतिउत्साहीपणा टाळा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. शत्रूशी बोलताना सावधगिरी बाळगा.


मकर (Capricorn Horoscope) : व्यवसायातील कोणत्याही बदलाबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळेल. एखाद्या गोष्टीची चिंता सतत सतावेल. त्यामुळे तुम्हाला काम करावेसे वाटणार नाही. मोठी रक्कम गुंतवणे टाळावे. कामाच्या ठिकाणी तुमचा अपमान होऊ शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मानसिक समस्या निर्माण होतील. खर्चाच्या अतिरेकामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता.


कुंभ (Aquarius Horoscope) : अनावश्यक राग आणि वाद टाळा. व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्हाला पालकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. कामात उत्साह राहील. व्यवसायात मित्रांकडून सहकार्य मिळेल. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले पैसे परत मिळतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका.


मीन (Pisces Horoscope) : नोकरीचे प्रयत्न यशस्वी होतील. वेळेचा सदुपयोग कराल. नातेवाईकांच्या भेटीची शक्यता आहे. मागील गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. रखडलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत कार्यक्षेत्र वाढवता येईल. स्वभावात चिडचिडेपणा राहील. राजकारणात यश मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात मानसन्मान मिळाल्याने तुमचे मनोबल आणखी वाढेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :