19th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 मे चे दिनविशेष.


1536 : इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांच्या पत्नीचा शिरच्छेद


19 मे 1536 मध्ये इंग्लंडचा राजा आठवा हेन्री यांच्या पत्नी अॅन बोलेन यांचा व्यभिचाराबद्दल शिरच्छेद करण्यात आला होता. 


1604 : कॅनडात मॉन्ट्रिआल शहराची स्थापना


मॉन्ट्रिआल शहराची स्थापना कॅनडामध्ये 19 मे 1604 रोजी झाली. मॉन्ट्रिआल हे कॅनडाच्या क्वूबेक प्रांतातील सर्वात मोठे शहर आहे. मॉन्ट्रिआल शहरातील नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. तसेच हे जगातील सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. 


1743 : जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी केली विकसित


जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान पातळी 19 मे 1743 रोजी विकसित केली. 


1910 : हॅले धूमकेतू पृथ्वीजवळून गेला


हॅले धूमकेतू या धूमकेतूचे नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या नावावरून दिले गेले आहे. धूमकेतूचा आवर्तनकाल 76 वर्षांइतका आहे. इ.स. 1910 मध्ये हॅले धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता.


1911 : पार्कस कॅनडा जगातील पहिल्या उद्यान सेवेला सुरुवात


19 मे 1911 रोजी पार्कस कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय उद्यान सेवा सुरू झाली. 


1913 : माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा जन्म


भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचा 19 मे 1913 रोजी जन्म झाला. स्वातंत्र्य चळवळीतील ते एक निष्ठावान कार्यकर्ते होते. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या बहुविध आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. त्यानंतर 3 डिसेंबर 1959 रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे. नीलम संजीव रेड्डी हे भारताचे सहावे राष्ट्रपती होते. 


रस्किन बॉंड


रस्किन बॉंड हे भारतीय लेखक व कवी आहेत. त्यांनी 500 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. ललित लेखनासाठी रस्किन बॉंड प्रसिद्ध होते. 


1938 : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरिश कर्नाड यांचा जन्म


गिरिश कर्नाड हे भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये झाला. कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी जास्त प्रसिद्ध होते. त्यांच्या बहुतेक कानडी नाटकांची मराठी रुपांतरे झाली आहे. तसेच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 


1964 : दाक्षिणात्य अभिनेते मुरली यांचा जन्म


दाक्षिणात्य अभिनेते मुरली यांचा जन्म 19 मे 1964 रोजी झाला. त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केले आहे. 


1297 : संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाई यांचे निधन


संत मुक्ताबाई यांचे नाव मुक्ताई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते.  संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. मुक्ताबाईंना बालपणी खूप कष्ट करावे लागले. 19 मे 1297 रोजी त्यांचे निधन झाले. 


1904 : जमशेदजी टाटा यांचे निधन


मिठापासून आलिशान मोटारींपर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे 19 मे 1904 रोजी निधन झाले. जमशेदजी टाटा हे आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार असण्यासोबत टाटा उद्योग समूहाचे संस्थापकदेखील होते. 


2008 : मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन


विजय तेंडुलकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक तसेच राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईंडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे. 19 मे 2008 रोजी विजय तेंडुलकर यांचे निधन झाले. 


संबंधित बातम्या


17th May 2022 Important Events : 17 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना


18th May 2022 Important Events : 18 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना