डोकेदुखीचा त्रास होणं
अनेकदा डोकेदुखीचा त्रास सतावतो. अशातच त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही औषधं घेतली जातात. पण औषधांचाही काहीच उपयोग होत नाही आणि डोकेदुखीचा त्रास पुन्हा सतावू लागतो. पण अशातच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. अनेकदा डोकं दुखण्याचं कारण डोळेही असू शकतात. डोळ्यांच्या समस्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल किंवा टिव्ही स्क्रिन समोर सतत बसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.
पाहा व्हिडीओ : आला हिवाळा, आरोग्य सांभाळा | घे भरारी | आरोग्य
धुरकट दिसणं
वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. परंतु, अनेकदा कमी वयातच डोळ्यांना सूज येणं, धुरकट दिसणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा या समस्येकडे अशक्तपणाचं लक्षण समजून दुर्लक्ष केलं जातं. परंतु, या समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. धुरकट दिसणं एखाद्या आजाराचं लक्षणं असू शकतं. हे डोळ्यांच्या रेटिन्यालाही नुकसान पोहचवू शकतं. अशा परिस्थितीत लगेच डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे.
डोळ्यांना थकवा जाणवणं
तुमच्या डोळ्यांना सतत थकवा जाणवत असेल तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यांशी निगडीत आजारांचं लक्षण असण्याचीही शक्यता असते.
टीप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.
संबंधित बातम्या :
हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी दररोज ब्रश करणं ठरतं फायदेशीर; संशोधनातून खुलासा
शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी खा 'हे' सुपरफूड्स
ऑफिसमध्ये कामाची शिफ्ट सतत बदलतेय?; होऊ शकतात 'हे' आजार
कमी वयातच केस पांढरे?; जाणून घ्या कारणं आणि उपाय!