1. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात शस्त्र बाळगण्यास मनाई, जमाव बंदी लागू, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाचा निर्णय

2. पाथरी-साईंचं जन्मस्थळ उल्लेख मुख्यमंत्र्यांकडून मागे, बैठकीनंतर शिर्डीचे खासदार लोखंडेंचा दावा, मात्र पाथरीकरांना दावा अमान्य, आज सर्वपक्षीय बैठक

3. 2014 मध्ये सत्तास्थापनेसाठी सेनेचा काँग्रेसला प्रस्ताव, पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा, तर शिवसेनेचा खरा चेहरा समोर आल्याची भाजपची बोचरी टीका

4. महाविकासआघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफीची योजना फसवी आणि तकलादू, राजू शेट्टींचा सरकारला घरचा आहेर, बळीराजाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा

5. अंबरनाथ येथील मनसे उमेदवाराची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा आरोप
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जानेवारी 2020 | मंगळवार | ABP Majha


6. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संवेदनशीलता, व्यथित होऊन जीवन संपवायला आलेल्या नांदेड येथील शेतकऱ्याला नवी उमेद

7. 26 ते 28 जानेवारीदरम्यान मुंबईत पारा घसरणार, हवामान विभागाचा अंदाज, तापमान 14 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता

8.. तानाजीमध्ये इतिहासाचा चुकीचा अर्थ रंगवून सांगितला, उदयभानची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानची आक्षेपार्ह टिप्पणी, वादाला तोंड

9.. सिद्धिविनायक मंदिराचा गाभारा सोन्यानं झळाळला, भाविकाकडून 35 किलोचं सुवर्णदान, सिद्धिविनायक ट्रस्टच्या उत्पन्नातही 18 कोटींनी वाढ

10. इराण-अमेरिकेत संघर्ष सुरुच, इराकच्या ग्रीन झोनमध्ये पुन्हा रॉकेट हल्ला, अमेरिकेच्या दूतावासाजवळ तीन रॉकेट्सचा मारा