Health Tips : घाईघाईने खाण्याची सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते; जाणून घ्या तोटे
Health Tips : जेव्हा आपण अन्न घाईघाईने खातो, तेव्हा आपण ते चघळण्याऐवजी थेट गिळतो, यामुळे अन्न घशात अडकू शकते
Health Tips : जेवताना (Food) प्रत्येक घास किमान 32 वेळा तरी चघळावा असं आयुर्वेदात म्हटलंय. यामुळे पचनाशी संबंधित बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटीशी संबंधित समस्या दूर होतात. पण, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना नीट जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी घाईघाईने जेवणाच्या नादात लोक आपल्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आज या ठिकाणी घाईघाईने जेवण करायचे तोटे नेमके कोणते आहेत याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
घाईघाईत खाण्याचे तोटे
अन्न घशात अडकू शकते
जेव्हा आपण अन्न घाईघाईने खातो, तेव्हा आपण ते चघळण्याऐवजी थेट गिळतो, यामुळे अन्न घशात अडकू शकते आणि एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. तसेच, जेव्हा तुम्ही अन्न चघळत नाही, तेव्हा शरीराला त्यातील पोषक तत्व मिळत नाहीत, त्यामुळे अन्नाचा आनंद घेत हळूहळू खा.
पचनसंस्थेसाठी हानिकारक
घाईघाईत खाल्ल्याने पचनासाठी आवश्यक असलेली तोंडातील लाळ आपले काम नीट करू शकत नाही आणि अन्नाचे पचन नीट न झाल्यास आंबट ढेकर येणे, पोट फुगणे , बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात.
वजन वाढू शकते
अनेक वेळा घाईघाईत खाल्ल्याने आपलं पोट नीट भरत नाही आणि त्यामुळे वारंवार भूक लागते. त्यामुळे पोट भरण्याच्या नादात अनेकदा अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.
मधुमेहाची समस्या असू शकते
अनेकदा घाईघाईने जेवण्याच्या नादात आपण अन्न नीट चघळत नाही. यामुळे तुमचं वजन वाढू शकते. तसेच, यामध्ये अनेकदा टाईप-2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. मात्र, त्याबरोबरच मधुमेह आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
कोलेस्ट्रॉल वाढू शकतो
जे लोक घाईत अन्न खातात त्यांच्या शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची कमतरता असते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतो. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या वाढणे. त्यामुळे जेवताना घाई करू नका. जेवताना जर तुम्ही स्वत:ला या सवयी लावून घेतल्या तर यामुळे तुमच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :