(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : आल्याचं पाणी की आल्याचा चहा? तुमच्या आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर? वाचा सविस्तर
Health Tips : हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोकांना आल्याचा चहा प्यायला आवडतो.
Health Tips : आलं (Ginger Trend) हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा सर्वांत महत्त्वाच्या फळांपैकी एक आहे. जेवणाची चव वाढवण्यापासून ते कडक चहा बनवण्यापर्यंत अनेक प्रकारे आलं आपल्या आहाराचा एक भाग म्हणून उपयुक्त आहे. चव वाढवण्याबरोबरच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामुळेच लोक अनेक प्रकारे आ्याचा आहारात समावेश करतात. काही लोक त्याचा चहा पितात तर काही जण आल्याचे पाणी पितात. मात्र, या दोन्हींबाबत अनेकदा मनात प्रश्न पडतो की आरोग्यासाठी नेमकं काय चांगलं आहे?
आल्याचं चहा आणि त्याचे पाणी यामध्ये कोणते चांगले आहे हे जाणून घेण्याची तुमची इच्छा असेल, तर आज या ठिकाणी आम्ही याच संदर्भात अधिक माहिती तुम्हाला ात आला आहात?
आल्याचा चहा
हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोकांना आल्याचा चहा नेहमी प्यायला आवडतो. अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध, हा चहा विविध आरोग्य परिस्थितींमध्ये फायदेशीर ठरू शकतो. तसेच ते आरोग्यास देखील हानी पोहोचवू शकते. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस, अॅसिडीटी आणि पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.
कोरडे आल्याचे पाणी
जर तुम्ही वात-प्रेरित समस्यांनी त्रस्त असाल, तर कोरडे आले पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे तुमची पचनसंस्था सुधारते आणि सूज दूर करण्यास मदत करते. इतकंच नाही तर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर कोरड्या आल्याचं पाणी यामध्ये खूप प्रभावी ठरेल. हे चयापचय वाढवते आणि अन्नाची लालसा कमी करते.
ताजे आल्याचं पाणी
ताजे आल्याचे पाणी आपल्याला सर्दी किंवा खोकल्यापासून आराम देण्यास खूप मदत करू शकते. एवढेच नाही तर, ते तुमच्या हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. आल्याचे ताजे पाणी रक्तवाहिन्या ओपन करते, ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि रक्तदाब देखील कमी होतो.
चहा की पाणी काय जास्त चांगलं?
आल्याचे पाणी आणि आल्याचा चहा यामधील कोणते अधिक आरोग्यदायी आहे याबद्दल जर आपण बोललो तर दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. तसेच, जास्त चहाचे सेवन केल्याने काही दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून, सर्व काही मर्यादित प्रमाणातच खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :