Monsoon Diet : पावसाळा (Mansson) उष्णतेपासून दिलासा देतो पण सोबत अनेक आजारही (Disease) घेऊन येतो. म्हणूनच यावेळी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत आहे त्यांच्यासाठी मान्सून खूप आव्हानात्मक आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा विषाणू आणि जीवाणूंच्या संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे स्वच्छतेबरोबरच अन्नाची काळजी घेतली पाहिजे. सामान्य दिवसात ज्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात, त्याच गोष्टी पावसात नुकसान करू लागतात. यामध्ये दुधाचाही समावेश आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूध कमी प्यावे असं आयुर्वेदात सांगिंतलं.
पावसाळ्याच्या दिवसात दूध का पिऊ नये
आरोग्य तज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात दूध (Milk) आणि दही (Curd) यांसारखे दुग्धजन्य पदार्थ टाळावेत. या ऋतूमध्ये या गोष्टींमध्ये जंतू वाढू शकतात. त्यामुळे त्याचा नकारात्मत परिणाम शरीरावर होऊन नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. जर एखाद्याची पचनक्रिया (Digestion) दुर्बल असेल तर पावसाळ्यात दही खाल्ल्याने समस्या आणखी वाढू शकते. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा सर्दी आणि फ्लू होऊ शकतो.
पावसात दूध प्यायचे असेल तर काय करावे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला दररोज दूध प्यायचे असेल आणि पावसाळ्यातही ते प्यावेसे वाटत असेल, तर तुम्ही त्यात हळद (Turmeric) मिसळून ते पिऊ शकता. त्यामुळे दुधाची ताकदही वाढते आणि संसर्गजन्य आजारांचा धोकाही कमी होतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही वाढते.
पावसाळ्यात काय खाऊ नये?
हिरव्या पालेभाज्या
अनेकदा आपल्याला हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables) खाण्याचा सल्ला दिला जातो. पण पावसाळ्यात त्या शक्यतो खाऊ नयेत. या हंगामात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने विषाणूंचे प्रमाण वाढते. ज्या मातीत भाजीपाला पिकवला जातो ती आजकाल खूप घाण झाली आहे. म्हणूनच हिरव्या भाज्या खाणे टाळावे. जर तुम्ही हिरव्या भाज्या खात असाल तर त्या चांगल्या धुवून नीट शिजवा.
तळलेले अन्न खाऊ नका
पावसात समोसे किंवा भजे किंवा तळलेली कोणतीही वस्तू न खाणे चांगले. या गोष्टी खाल्ल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या समस्या उद्भवू शकतात. अपचन, पोट फुगणे , जुलाब याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तळलेले तेल पुन्हा वापरू नका हेही लक्षात ठेवा. ते विषारी असू शकते.
इतर महत्वाच्या बातम्या
Food Poisoning : पावसाळ्यात फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी 'या' गोष्टी कायम लक्षात ठेवा!