Pune News : पुण्यात पीएमपीएमलचे अनेक अपघात होतात. शिवाय या पीएमपीएमएलमुळे अनेकदा नागरिकांना इजादेखील होते. त्यातच आता पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या 76 वर्षीय व्यक्तीला पीएमपीएमएल बसने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोंढवा येथील साळुंखे विहार रोडवरील रिलायन्स फ्रेश मार्टजवळ ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिपीन जसवंतराय दवे (76) असे मृताचे नाव असून ते रस्ता ओलांडत असताना पीएमपीएमएल बसने त्यांना धडक दिली. चालकाने बस थांबवली नाही आणि घटनास्थळावरून पळ काढला. दवे यांचा मुलगा हेतव दवे (44) याने आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. या अपघातात बिपीन दवे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पीएमपीएमएलच्या अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
पीएमपीएमएलचं छत गळलं...
पीएमपीएमएलला सीट आणि दारांची दुरवस्था आणि बसेसच्या उशिरा वेळापत्रकामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता पावसाळाही सुरु झाला असून नागरिकांना प्रवास करताना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
नुकतीच बसच्या छताला गळती लागल्याने लोक पावसात भिजत असल्याची घटना घडली. इंटरनेटवर हा व्हिडीओ समोर आला. पीएमपीएमएल पुन्हा पुणेकरांच्या रडारवर आली आहे. पावसाच्या पाण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी एका महिलेने बसमध्ये आपली छत्री उघडली. स्वारगेटहून धायरीकडे जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली. पुण्यात पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितलं की, कामानिमित्त पुण्यात आलो होतो आणि संध्याकाळी 5 वाजता पीएमपीएमएल बसने प्रवास करत होतो. त्यावेळी जोरदार पाऊस सुरू झाला आणि छतही गळू लागले. बसची परिस्थिती बिकट असल्याचं त्यांनी सांगितलं.
वाईट अवस्था असलेल्या बसेसना परवानगी देणे म्हणजे पीएमपीएमएलच्या प्रवाशांचा अपमान करण्यासारखे आहे. कोणतीही खबरदारी घेतली जात नाही पैसे फक्त नवीन योजनांवर खर्च केले जातात आणि स्मार्ट बस स्टॉप त्यापैकी एक आहे. फक्त जुन्या बसेसच नाही तर 5-6 वर्षे जुन्या बसेसही नीट चालत नाहीत. प्रादेशिक परिवहन विभाग अशा बसेसची पुरेशी तपासणी न करताच त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देत असल्याचा आरोपही पीएमपीएलवर नागरिकांकडून केले जात आहे.
हेही वाचा -