Turmeric Water Benefits : हळद (Turmeric) ही प्रत्येक भारतीय घरातील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मसाल्याच्या पदार्थांत देखील हळदीचा समावेश असतो. हळदीचा वापर जेवणाची चव वाढविण्यासाठी केला जातो. पण त्याहीपेक्षा हळदीचा उपयोग औषध म्हणून केला जातो. यामध्ये असे अनेक पोषक घटक असतात ज्यांचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. अनेकदा घरी कोणी आजारी असेल तर आपण त्या व्यक्तीला हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की हळदीचे पाणी पिणे देखील शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया हळदीचे पाणी पिण्याचे नेमके काय फायदे आहेत.


हळदीचे पाणी पिण्याचे फायदे


1. हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. यामुळे हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरातील सूज कमी होते. सांधेदुखी यांसारख्या समस्यांवर हळदीचे पाणी पिऊन उपचार करता येतात.


2. हळदीमध्ये कर्क्यूमिन, अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. शरीराला संसर्गाशी लढण्यात मदत होते आणि अशा प्रकारे तुम्ही रोगांपासून स्वत:चा बचाव करू शकता. 


3. हळदीचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. रक्त स्वच्छ होते आणि मुरुमांची समस्या देखील टाळता येते. हळदीचे पाणी प्यायल्याने त्वचेची चमक वाढते. wrinkles आणि वृद्धत्व देखील दिसत नाही. 


4. हळदीमध्ये कर्क्यूमेन आढळते जे कॅन्सरविरोधी गुणधर्म म्हणून काम करते. हे कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे शरीराला होणारे नुकसान कमी करतात.


5. हळदीचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. ते तुमची पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. यामुळे चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.


6. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला तणावापासून वाचवण्यास मदत करतात. यामुळे मन तीक्ष्ण होते आणि मेंदूचे कार्य देखील सुधारते.


हळदीचे पाणी बनवण्याची पद्धत


हळदीचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाणी गरम करून त्यात अर्धा चमचा हळद घालून चांगले मिक्स करू द्या. आता हे पाणी उकळून एका कपमध्ये गाळून त्यात मध मिसळा आणि रोज सकाळी प्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : फिट राहण्यासाठी फक्त जॉगिंग नाही...'रिव्हर्स वॉकिंग'सुद्धा फायदेशीर; जाणून घ्या आरोग्यासाठीचे फायदे