Immunity Booster Juice : पावसाळा नुकताच सुरू झाला आहे. पावसाळा हा खूप खास मानला जातो. अनेकांना पावसात भिजायला फार आवडते. मात्र अल्हाददायक वाटणारा हा पाऊस अनेक संसर्गजन्य आजारांना (Infectious Disease) आमंत्रण देतो. या ऋतूत (Season) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो. अतिवृष्टीमुळे शहरांसह अनेक भागात पाणी साचले आहे. दूषित पाणी साचल्याने जलजन्य आजारांचा धोका वाढतो. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, जगभरातील 80 टक्के आजार पाण्यामुळे होतात. अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार पसरतात. अनेक दिवस साठवलेल्या पाण्यात बॅक्टेरिया आणि बुरशी निर्माण होतात, जे संसर्गाचे कारण बनतात. पावसाळ्यात अनेकदा डास, पाणी, हवा आणि अन्न यांच्या मार्फत संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या ऋतूमध्ये शारीरिक काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहण्यासाठी या काही फळांचे ज्यूस पिणे फार गरजेचे आहे.


जांभळाचा ज्यूस


जांभुळ हे उन्हाळी हंगामातील एक उत्तम फळ आहे. हे जेवढे खायला चविष्ट दिसते, तेवढेच आरोग्यालाही लाभते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. पावसाळ्यात जामुनचा रस प्यायल्यास पावसाळ्यातील आजारांपासून सुरक्षित राहू शकतो.


डाळींबाचा ज्यूस


तुम्ही तुमच्या आहारात डाळींबाचा ज्यूस देखील समाविष्ट करू शकता. तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे देखील खूप उपयुक्त ठरू शकते. प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शिअम फॉस्फरस आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप मजबूत होते.


चेरी ज्यूस


पावसाळ्यात तुम्ही चेरी ज्यूसला तुमच्या आहाराचा भाग देखील बनवू शकता. चेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फॉस्फरस असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.


मोसंबी ज्यूस


डाळिंब आणि मोसंबीचा रस- डाळिंबाचा रस आणि मोसंबीचा रस देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. डाळिंब शरीरातील रक्त वाढवते. त्याचबरोबर मोसंबीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते.


संत्र्याचा रस


तुम्ही तुमच्या आहारात संत्र्याचा रस देखील समाविष्ट करू शकता. संत्र्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. जर शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण योग्य असेल तर रक्तातील पांढऱ्या पेशी देखील चांगल्या प्रमाणात राहतात.त्यामुळे रोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.


इतर महत्वाच्या बातम्या


What is Diabetic Neuropathy : डायबिटीज आहे? पाय दुखतायत, पायांना सतत जळजळ होतेय? जाणून घ्या कारण अन् उपाय