Curd Rice: आपल्यातील बहुतेकांनी कधी ना कधी साऊथ इंडियन जेवणाचा अस्वाद घेतला असेल. साऊथ इंडियन जेवणात अनेक पोषणतत्व असतात. तुम्ही जर साऊथची डिश खाणं  पसंद करत असाल तर अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. यापैकीच एक कर्ड राईसचा प्रकार आहे. कर्ड राईस (Curd Rice) म्हणजे दही-भात याचं कॉम्बिनेशन असणारी डिश आहे. 


या डिशच्या सेवनान वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुमच्या आहारात दही-भाताचा समावेश केल्यामुळे शरीरातील पोषक सुक्ष्मजीवांचं संतुलन राखलं जातं. यामध्ये भरपूर पोषण तत्वांचा समावेश असल्यानं आरोग्यवर्धक आहे. तसेच ही डिश झटपट तयार केली जाऊ शकते. यामुळे कमी वेळेत भरपूर पोषण तत्व असणारी डिश आहे. आज  आपण दही-भात अर्थात कर्ड राईस खाण्यामुळे मिळणारे फायदे याबद्दल माहिती  जाणून घेऊया...  


दही-भात खाण्याचे आहेत अनेक फायदे


1. तुमच्या नियमित आहारात दही-भाताचा समावेश केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. दही आणि भातामध्ये फॅटचं प्रमाण खूप कमी असतं. यामध्ये कॅलरीजही  खूप कमी प्रमाणात असतात. वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या  नियमित डायटमध्ये समावेश करू शकता. शरीरात कमी कॅलरीज जाऊनही अनेक तास भूक लागत नाही. 


2. तुम्हाला जर ओव्हर इटिंगपासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर कर्ड-राईसची डिश चांगला पर्याय ठरू शकते. या डिशमध्ये कॅलशियम आणि प्रोबॉयोटीक्ससारख्या बॅक्टेरियाचं प्रमाण भरपूर असतं. यामुळे शरीराचे आरोग्य निरोगी राहते आणि पचनशक्ती चांगली राहते. तसेच वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते.


3. कर्ड राईसच्या आहारात समावेश केल्यानं मेटाबॉलिज्म अर्थात चयापचय क्रिया सुधारण्यास मदत मिळते. यामुळे वजन कमी राहते आणि तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते. 


4. या डिशमध्ये आयर्न आणि मॅग्नेशियमसारखे भरपूर पोषण तत्व असतात. यामुळे शरीरातील उच्चरक्तदाबाची समस्या असणाऱ्यांना अनेक फायदे मिळू शकतात. 


5. तुम्ही जर उन्हाळ्याच्या काळात नियमितपणे दही-भात खात असाल तर शरीरात थंडावा राहण्यास मदत मिळू शकते.


6. या डिशचा आहारात समावेश केल्यामुळे शरीर अत्याधिक एनर्जेटिक राहण्यास मदत मिळते. याशिवाय कडक उन्हामध्येही शरीर दीर्घकाळापर्यंत क्रियाशील राहण्यासाठी मदत मिळते.


7. दह्यामध्ये प्रोबॉयोटिक्स अँटिऑक्सीडेंट आणि आवश्यक फॅट्स उपलब्ध असतात. यामुळे मेंदूत तणाव आणि वेदना निर्माण करणाऱ्या भावनांचा सामना करण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे कर्ड राईसची डिश खाण्यासाठी चविष्ट नाही तर तुमचा तणाव दूर करणारी स्पेशल डिश बनते. असे  नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉरमेशनचं म्हणणं आहे.


8. तुमच्या आहारात नियमितपणे कर्ड राईसचा समावेश असेल तर प्रतिकारशक्ती वाढते. या डिशसाठी ताजा कडीपत्ता, बारीक राई आणि तुपाची फोडणी दया. तसेच आवश्यकतेनुसार मीठाचा वापर कराल. यामुळे ही डिश अत्यंत चविष्ट होईल आणि खाताना आनंद मिळेल. 


(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सर्वसामान्यांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा प्रश्नांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)