एक्स्प्लोर

Health Tips : टोमॅटोचे जास्त सेवन आरोग्यासाठी धोकादायक; शरीराला होऊ शकतात 'हे' 5 नुकसान

Tomato Side Effects : कोणत्याही गोष्टीप्रमाणे टोमॅटोचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. त्याचप्रमाणे टोमॅटोचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते.

Tomato Side Effects : टोमॅटोचं सेवन बहुतेक प्रत्येक घरात केला जातो. विशेषत: भाजीत टोमॅटोचा जास्त वापर केला जातो. बरेच लोक सॅलड बनवतात आणि जेवणासोबत खातात. टोमॅटोमध्ये कॅलरी कमी आणि पौष्टिकता भरपूर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात, जे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करतात. या दृष्टीने टोमॅटोचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

मात्र, कोणत्याही गोष्टीचे फायदे तसेच तोटेही आहेत. त्याचप्रमाणे टोमॅटोचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते. जास्त टोमॅटो खाल्ल्याचा एक सामान्य दुष्परिणाम म्हणजे लाइकोपीनचा ओव्हरडोज. या ठिकाणी आम्ही तुम्हाला टोमॅटोच्या अतिसेवनाच्या 5 वाईट परिणामांबद्दल सांगणार आहोत.

अॅसिडिटीची समस्या

टोमॅटो आम्लयुक्त असतात, जे तुमच्या पोटात अधिक गॅस्ट्रिक अॅसिड तयार करण्याचे काम करतात. जास्त टोमॅटो खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. 

सांधे दुखी

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी समस्या उद्भवू शकते. कारण टोमॅटोमध्ये सोलॅनिन नावाचा अल्कलॉइड असतो. यामुळे सांध्यांना सूज आणि वेदना होऊ शकतात. टोमॅटो ऊतींमध्ये कॅल्शियम तयार करतात, ज्यामुळे पुढे जळजळ होऊ शकते.

ऍलर्जी होते

टोमॅटोमध्ये आढळणारा हिस्टामाइन हा घटक त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जीची समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला टोमॅटोची ऍलर्जी असेल तर त्याचे कमी प्रमाणात सेवन करा किंवा आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन केल्याने तोंड, चेहरा आणि जिभेला सूज येणे, घशातील संसर्ग यांसारख्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया जाणवू शकतात. जर तुम्हाला टोमॅटोची ऍलर्जी असेल, तर त्याला स्पर्श केल्यास देखील तुमच्या त्वचेवर सूज आणि जळजळ होऊ शकते.

मूत्रपिंडाची समस्या

किडनीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटोचे सेवन करू नये. कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. टोमॅटो, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप आणि इतर टोमॅटो-आधारित पदार्थांचे सेवन टाळल्याने रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे गंभीर मूत्रपिंड समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
आज आम्हाला अटक होऊ शकते, पण तरीही आंदोलन शांततेत सुरु ठेवा; आपली एकच मागणी धर्मेंद प्रधानांचा राजीनामा, तोपर्यंत माघार नाही, अभिजित दिपकेंचं आवाहन
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
Embed widget