एक्स्प्लोर

तुम्हीही घाईघाईत जेवून आजारांना आमंत्रण देताय का? नुकसान जाणून घ्या

Food Eating Habit : जेवताना अन्न हळूहळू खाण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो.

Food Eating Habit : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वत:कडे लक्ष देणं विसरत चाललो आहोत. आपल्या आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या कोणत्या वाईट याचा सुद्धा आपण विचार करत नाही. त्यामुळे बाहेरचं जंक फूड खाणं, आरोग्याकडे दुर्लक्ष करणं यांसारखे प्रकार अगदी सहज घडतात. आपल्याजवळ इतका वेळ नसतो की जेवतानाही आपण घाईघाईने जेवतो. आयुर्वेदात हळूहळू आणि चघळल्यानंतर खाण्याचा सल्ला दिला आहे. विज्ञानाचा देखील या गोष्टीवर विश्वास आहे. विज्ञानानुसार अन्न लवकर खाल्ल्याने अन्नाबरोबर हवाही शरीरात पोहोचते. त्यामुळे गॅस आणि ब्लोटिंगची समस्या सुरू होते. जर तुम्हीही फास्ट अन्न खात असाल तर तुम्हाला फास्ट खाण्याचे दुष्परिणाम देखील जाणून घेणं गरजेचं आहे.

लवकर वजन वाढणे

विज्ञानानुसार, जेव्हा आपण अन्न जेवतो तेव्हा मेंदू 20 मिनिटांनंतर पोट भरल्याचा सिग्नल पाठवतो. जेव्हा अन्न पटकन खाल्ले जाते, तेव्हा मेंदू हा सिग्नल उशिराने देतो. ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते. त्यामुळे वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.
 
मधुमेहाचा धोका

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, लवकर अन्न खाणाऱ्यांना हळू खाणाऱ्यांच्या तुलनेत अडीच पट जास्त मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी खालावते, ज्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
 
इन्सुलिन प्रतिकार

फास्ट खाणाऱ्यांच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिनची पातळी बिघडते. त्यामुळे चयापचय समस्या वाढू लागतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही असतो.
 
पचन समस्या

अन्न खूप वेळा खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात. जेव्हा आपण लवकर खातो तेव्हा आपण अन्नाचे मोठे तुकडे उचलतो. ते पचवण्यासाठी पचनसंस्थेला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे अपचनाची तक्रार होऊ शकते आणि अन्नही उशिराने पचते.
 
मन तृप्त होत नाही 

जेव्हा तुम्ही पटकन अन्न जेवता तेव्हा तुमचे पोट अन्नाने भरले तरी तुमचे मन तृप्त होत नाही. यामुळे, आपण अन्नाने तृप्त होऊ शकत नाही. यामुळेच काही लोक अनेकवेळा पोट भरूनही अन्न खातात. त्याचा परिणाम वजनावर दिसू लागतो आणि लठ्ठपणा वाढू लागतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : बदलत्या ऋतूत बॅक्टेरिया किडनीला नुकसान पोहोचवू शकतात; टाळायचे असल्यास 'हे' उपाय करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
राज्यातील 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट, अरबी समुद्रावर कमी दाब, वाचा सविस्तर IMD अंदाज
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Eknath Shinde Oath: एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? वर्षा बंगल्यावरील रात्रीच्या बैठकीनंतर फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Embed widget