(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तुम्हालाही रोज नाश्त्यात ओट्स खाण्याची सवय आहे? वाचा ओट्सचा आरोग्यावर होणारा परिणाम
Health Tips : ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही.
Health Tips : असं म्हणतात सकाळची सुरुवात जर चांगल्या हेल्दी नाश्त्याने झाली तर पोटही भरलेलं राहते आणि दिवसभर उत्साह सुद्धा राहतो. यासाठी सकाळचा नाश्ता कोणत्याही परिस्थितीत वगळू नये असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे नाश्त्यामध्ये आरोग्यदायी गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक लोकांना नाश्त्यात ओट्स (Oats) खायला आवडतात. ओट्समध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि आहारातील फायबरसारखे अनेक पोषक घटक आढळतात.
ओट्स हे सर्वसाधारणपणे आरोग्यासाठी आरोग्यदायी मानले जाते. पण ओट्स हे सर्व लोकांसाठी आरोग्यदायी आहेच असे नाही. ओट्स खाल्ल्यानंतर अनेकांनी आरोग्यावर नकारात्मक परिणाम अनुभवले आहेत. जर तुम्ही नाश्त्यात ओट्स खात असाल तर वेळीच या गोष्टींबाबत सावधानता बाळगा.
ऍलर्जीची शक्यता
कदाचित खूप कमी लोकांना माहित असेल की ओट्समुळे ऍलर्जी देखील होऊ शकते. ओट्स खाल्ल्यानंतर काही लोकांना त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे देखील होऊ शकते.
रक्तातील साखर वाढते
ओट्स कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सच्या रेंजमध्ये येतात पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर वाढू शकते. ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करेल की वाढण्यास हातभार लावेल हे ते खाण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे.
प्रक्रिया केलेले ओट्स
बाजारात अनेक प्रकारचे ओट्स उपलब्ध आहेत. काही ओट्स आहेत ज्यांना चव आहे तसेच झटपट बनवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे भरपूर प्रक्रिया करून बनवले जातात. तसेच, त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी हानिकारक रसायने देखील जोडली जातात. जर तुम्ही या प्रकारच्या ओट्सचे नियमित सेवन करत असाल तर तुमच्या समस्या नक्कीच वाढतील.
पचनाच्या समस्या उद्भवू शकतात
ओट्स ग्लूटेन मुक्त असतात परंतु ते खाल्ल्याने काही लोकांमध्ये पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. उच्च फायबर सामग्रीमुळे, काही लोकांमध्ये सूज येणे आणि इतर पाचन समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हीही रोज ओट्स खात असाल तर या कारणांचा नक्की विचार करा. जर तुम्ही वेळीच या लक्षणांकडे लक्ष दिलं तर तुमचं नुकसान होण्यापासून तुम्ही वाचू शकाल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :