Health Tips : लठ्ठपणा आणि हाय बीपीवर कोथिंबिरीच्या पानात दडलेत अनेक गुणधर्म; कसं वापराल ते जाणून घ्या
Health Tips : हिरव्या कोथिंबिरीच्या पानांमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स तसेच अनेक पोषक घटक असतात.

Health Tips : हिरव्या कोथिंबीरीची पाने भाज्यांची चव वाढवण्यासाठी फार उपयुक्त आहेत. या हिरव्या कोथिंबिरीची पाने शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आरोग्य तज्ञ सांगतात की, कोथिंबीर फक्त जेवणाची चव वाढविण्यासाठीच नाही र अनेक रोगांवरही रामबाण उपाय आहेत. कोथिंबिरीच्या पानांमध्ये उच्च कोलेस्ट्रॉल दूर करण्याचे गुणधर्म असतात. तसेच, ही पाने खाल्ल्याने वजन देखील नियंत्रित करता येते. हिरवी कोथिंबीर आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
कोथिंबीरच्या पानांचे आरोग्यदायी फायदे
हिरवी कोथिंबीर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते
हिरव्या कोथिंबिरीच्या पानांमध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स तसेच अनेक पोषक घटक असतात. या पानांचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येते. जेव्हा बेड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात असते तेव्हा लठ्ठपणा टिकत नाही आणि त्याशिवाय हृदयाशी संबंधित जोखीम देखील कमी होते. त्यामुळे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही कोथिंबीरीचा रसही नियमित पिऊ शकता. यासोबतच कोथिंबीर खाल्ल्याने उच्च रक्तदाब देखील नियंत्रणात ठेवता येतो ज्यामुळे हृदयाचा धोका वाढतो.
पाचन संबंधी फायदे
कोथिंबीरीत आढळणारे पाचक एंझाइम पोटाशी संबंधित आजार कमी करतात. यामुळे अपचन, गॅस, अॅसिडिटी, जळजळ आणि पोटात सूज यासारख्या समस्या दूर होतात आणि चयापचय सुधारते. इतकेच नाही तर कोथिंबीरच्या पानाने लघवीच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
कोथिंबीर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास उपयुक्त
एका अभ्यासानुसार, कोथिंबिरीच्या पानांमध्ये क्वेर्सेटिन आणि टोकोफेरॉलसारखे अँटी-ऑक्सिडंट आढळतात, ज्याच्या मदतीने कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. याशिवाय कोथिंबिरीच्या पानांमध्ये न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव देखील असतो ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. या पानांचे रोज सेवन केल्यास तुमचे शरीरही मजबूत होईल आणि विषारी पदार्थही बाहेर काढले जातील.
कोथिंबीरीची पाने मधुमेहामध्ये फायदेशीर
काही काळापूर्वी प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानंतर असे सांगण्यात आले आहे की रक्तातील साखरेमध्ये कोथिंबीर खूप फायदेशीर ठरते. कोथिंबिरीच्या पानांमध्ये आढळणारे इन्सुलिन परिणामकारकता वाढवते, ज्यामुळे शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याच्या पानांमध्ये आढळणाऱ्या अर्कांच्या मदतीने शरीरातील ग्लुकोजची पातळी संतुलित करणे खूप सोपे आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना कोथिंबिरीच्या सेवनाचा लाभ मिळू शकतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :























