Health Tips : हिवाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी कारलं अत्यंत गुणकारी; 'ही' पद्धत एकदा वापरून बघा
Winter Health Tips : कारलं तुम्हाला सर्दी आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देण्यास मदत करते.
Winter Health Tips : हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. उदाहरणार्थ, सर्दी आणि घसादुखी यांसारख्या अनेक आजारांचा प्रत्येकाला सामना करावा लागतो. म्हणूनच हिवाळ्यात विशेषत: खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अनेक फळे आणि भाज्या आहेत जे विशेषतः या ऋतूत खाण्यासाठी योग्य आहेत. या ठिकाणी आम्ही तुम्हाला हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या आणि इन्फेक्शन्सचा सामना करण्यासाठी कारलं कसं गुणकारी आहे हे सांगणार आहोत.
हिवाळ्यात कारलं खाण्याचे फायदे :
सर्दीसाठी उपयुक्त
अनेकजण कारल्याचं नाव घेताच नाक मुरडायला सुरुवात करतात. कारण त्याची चव खायला खूप कडू असते. पण तुम्हाला माहित आहे का की, ही कारली तुम्हाला सर्दी आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देण्यासाठी मदत करतात. त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीसुद्धा कारल्याचा आहारात समावेश कराल.
कारल्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतील
कारल्याचा रस हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. हा कारल्याचा ज्यूस तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता. घरी उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून हा ज्यूस तुम्हाला करता येईल. यासाठी तुम्हाला मिक्सरमध्ये कडधान्य, थोडं आलं, काळी मिरी, हळद आणि चवीनुसार काळे मीठ एकत्र करायचे आहे. त्यानंतर तुमचा कारल्याचा ज्यूस तयार आहे. तुम्ही इतरही अनेक पद्धतींनी कारल्याचा ज्यूस बनवू शकता.
रक्त स्वच्छ करण्यास मदत होते
जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कारल्याचा ज्यूस प्यायलात तर ते तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं आणि सकाळी प्यायल्याने पोट पूर्णपणे साफ होते. जर तुम्ही हा ज्यूस दोन-तीन दिवसांनी प्यायला सुरुवात केली तर तुमचे रक्त स्वच्छ होईल. ज्यामुळे तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तुमचा चेहराही तजेलदार राहील.
डोकेदुखी दूर होईल
नेहमी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर, कारल्याची पाने बारीक करून कपाळावर लावा. असे केल्याने डोकेदुखीमध्ये त्वरित आराम मिळेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.