(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सांधेदुखीच्या रुग्णांनी हिवाळ्यात 'या' चुका करू नये; नाहीतर हाडांवर होईल परिणाम
Health Tips : हिवाळ्यात हवामान खूप थंड असते आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो.
Health Tips : आर्थरायटिस (Arthritis) हा हाडांशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये गंभीर दुखणे आणि हात, पाय आणि शरीराच्या इतर सांध्यांना सूज येणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सांधेदुखी हा साधारणपणे वयोमानानुसार होणारा आजार मानला जातो. परंतु, योग्य आहारामुळे शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले की, सांध्यामध्ये क्रिस्टल्स जमा होतात, त्यामुळे लहान वयातही सांधेदुखी होऊ शकते. सांधेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांनी हिवाळ्यात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही काही चुका केल्या तर परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि तुम्हाला सांधेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.
हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. या हवामानात वातावरण खूप थंड असते आणि त्यामुळे सांधेदुखीचा त्रास तुम्हाला अधिक त्रास देऊ शकतो. अनेक वेळा सामान्य रोजच्या दिनश्चर्येतील काम करतानाही लोकांना त्रास होतो. त्यामुळे सध्याच्या हिवाळ्यात सांधेदुखी टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सतत एकाच जागी बसणे
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर एका जागी जास्त वेळ बसणे टाळा. कारण हिवाळ्यात सामान्य लोकांनाही शरीरात जडपणा येतो, तर तुम्हाला संधिवात असेल तर वेदना लक्षणीय वाढू शकतात. यामुळे एकाच जागी जास्त वेळ बसू नका.
थंड पाण्याचा वापर
हिवाळ्यात हवामान खूप थंड असते, त्यामुळे वेदना वाढू शकतात. त्याच वेळी, जर तुम्ही थंड पाण्याने काम करत असाल किंवा अंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर केला तर वेदना, सूज आणि जडपणाची समस्या आणखी वाढू शकते. यासाठी थंड पाणी वापरू नका.
'या' गोष्टी टाळा
सांधेदुखीच्या रुग्णांनी हिवाळ्यात आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त साखर, कॅफीनयुक्त पदार्थ (चहा-कॉफी), अस्वास्थ्यकर चरबीयुक्त पदार्थ, शुद्ध पदार्थ इत्यादींचे सेवन करणे टाळा. नाहीतर सांधे सुजणे आणि वेदना होऊ शकतात. त्याच वेळी, तुम्ही व्हिटॅमिन डी समृद्ध पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवा. यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्लाही घेऊ शकता. असे केल्याने तुम्हाला त्रास होणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :