Health Tips : 'या' हेल्दी पदार्थांचा तुमच्या नाश्त्यात समावेश करा; हृदयाबरोबरच तुमची हाडेही मजबूत राहतील
Health Tips : तुमचा सकाळचा नाश्ता जर योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा असेल दिवसभर तुम्ही उत्साही राहता.
Health Tips : आजकालच्या धावपळीत स्वत:ला फीट ठेवणं जास्त गरजेचं आहे. आणि स्वत:ला फीट ठेवायचं असेल तर शरीराला योग्य त्या वेळी योग्य आहार मिळणं गरजेचं आहे. यामध्ये देखील सकाळचा नाश्ता (Breakfast) हा सर्वात महत्त्वाचा असतो. मात्र, अनेकजण कामाच्या धावपळीत सकाळचा नाश्ता न करता ऑफिसला जातात. याचा परिणाम तुमच्या कामावर देखील होतो. यासाठी नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश असावा जेणेकरून तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. यासाठी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी, ब्रेड, हिरव्या भाज्या इत्यादींचा आहारात समावेश करू शकता.
तुमचा सकाळचा नाश्ता जर योग्य आणि पौष्टिक पदार्थांचा असेल दिवसभर तुम्ही उत्साही राहता. तसेच, निरोगी आणि पौष्टिक नाश्ता केल्याने हृदयाबरोबरच तुमची हाडेही मजबूत होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
एवोकॅडो (Avocado)
एवोकॅडो, मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात. हे तुमचे हृदय निरोगी ठेवते, त्यात पोटॅशियम देखील आढळते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
अंडी (Egg)
अंड्यांमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते, जे शरीरात कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक मानले जाते, ज्यामुळे हाडे देखील मजबूत होतात.
मल्टी ग्रेन ब्रेड
नाश्त्यासाठी तुम्ही मल्टी-ग्रेन ब्रेडचा समावेश करू शकता. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्थेसाठी तसेच हृदयासाठी खूप फायदेशीर असते.
हिरव्या भाज्या
पालक, मेथी इत्यादी भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात. यामध्ये कॅलरी कमी असल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
काजू
तुमच्या आहारात बदाम, अक्रोड, चिया सीड्स यांसारख्या ड्रायफ्रूट्सचा समावेश करू शकता. त्यामध्ये फायबर, फॅट्स आणि कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हृदयासह शरीरही निरोगी राहते.
बेरीज
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी यांसारख्या फळांमध्ये पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे हृदय तसेच हाडे निरोगी राहण्यास मदत होते.
या पौष्टिक पदार्थांचा जर तुम्ही तुमच्या न्याहारीमध्ये समावेश केला तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. तसेच, हेल्दी खाल्ल्याचं समाधानही राहील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :