एक्स्प्लोर

Health Tips : हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजच तुमच्या आहारात 'या' 5 हेल्थ ड्रिंक्सचा समावेश करा; रोगप्रतिकारशक्तीही वाढेल

Health Tips : तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचं असेल तर आजच तुमच्या आहारात 'या' 5 हेल्थ ड्रिंक्सचा समावेश करा.

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे, जो आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची कार्ये करतो. यामुळेच निरोगी राहण्यासाठी आपले हृदय निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, झपाट्याने बदलणारी जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या हृदयावर याचा परिणाम होतोय. वाईट जीवनशैली, तणाव, खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही हृदयाशी संबंधित आजारांची महत्त्वाची कारणे आहेत. अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही हेल्थ ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

गाजर आणि बीटचा ज्यूस

बीटरूट आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यात नायट्रेट असते जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते. त्याच वेळी, गाजरमध्ये असलेले नायट्रेट रक्त प्रवाह सुधारते. एवढेच नाही तर, त्यात बीटा-कॅरोटीन असते, जे रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत, गाजर आणि बीटचा ज्यूस हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

ब्रोकोली सूप

निरोगी हृदयासाठीही ब्रोकोली खूप महत्त्वाची आहे. यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड ल्युटीन हृदयाच्या धमन्यांना निरोगी ठेवते. तुम्ही जर ब्रोकोलीला तुमच्या आहाराचा भाग बनवल्याने हृदयविकाराचा झटका आणि इतर अनेक आजारांचा धोका कमी होतो. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात आढळते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू देत नाही. अशा परिस्थितीत ब्रोकोलीपासून बनवलेले सूप प्यायल्याने तुमचे हृदय निरोगी राहते.

पालक ज्यूस

हिवाळ्यात पालकाला तुमच्या आहाराचा भाग बनवून तुम्ही अनेक समस्या टाळू शकता. आयर्न समृद्ध, पालक व्हिटॅमिन के आणि नायट्रेटने देखील समृद्ध आहे. हे दोन्ही पोषक रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवून हृदयविकार टाळतात. इतकंच नाही तर, पालक केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर तुमचे हृदयही निरोगी ठेवते.

पुदिन्याचा ज्यूस

ताज्या पुदिन्याचा सुगंध सर्वांना भुरळ घालतो. चवीला उत्कृष्ट असण्याबरोबरच पुदिन्याचा ज्यूस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के आढळतात. अशा परिस्थितीत त्याचा रस प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

काकडीचा ज्यूस

काकडी फक्त उन्हाळ्यातच फायदेशीर नाही तर हिवाळ्यातही ती खाणे फायदेशीर आहे. हे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामध्ये भरपूर पाणी आणि फायबर असल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अनेक आजारांचा धोका कमी करतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Kitchen Tips : तुम्ही जे पनीर खाता ते चांगलं की बनावट? बाजारातून आणताच 'असं' तपासा

महत्त्वाच्या बातम्या

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
Hindu Religion : शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य
शिवलिंगासमोर उभं राहून टाळी वाजविणे पुण्य की पाप? जाणून घ्या 3 टाळ्यांमागचं खरं रहस्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget