Happy New Year 2024 : कुटुंबासह नवीन वर्ष सेलिब्रेट करण्याचे 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन्स; तुम्ही कोणता निवडाल?
Happy New Year 2024 : त्यामुळे तुम्हीही यावेळी नवीन वर्षाच्या पार्टीला जात नसाल तर कुटुंबासोबत घरीच सेलिब्रेशन करू शकता.
Happy New Year 2024 : नवीन वर्ष 2024 (Happy New Year 2024) सुरू व्हायला अवघे दोनच दिवस उरले आहेत. ख्रिसमसनंतर लोक नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू करतात. नवीन वर्षाची चाहूल लागताच सगळ्यात पहिली गोष्ट मनात येते ती म्हणजे पार्टी. हा पार्टीचा आनंद आपण मित्र-मैत्रिणींबरोबर तसेच कुटुंबीयांबरोबर सेलिब्रेट करतो. पण अनेक वेळा इच्छा असूनही घराबाहेर पार्टीला जाता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा मूड ऑफ करण्याची गरज नाही.
त्यामुळे तुम्हीही यावेळी नवीन वर्षाच्या पार्टीला जात नसाल तर कुटुंबीयांबरोबर घरीच अतिशय सुंदर पद्धतीने सेलिब्रेशन करू शकता. घरबसल्या तुम्ही अनेक प्रकारे अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुमचा वेळ अगदी आनंदात घालवू शकता.
कुटुंबीयांसह खेळ खेळा
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर काही उत्तम खेळ देखील खेळू शकता. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जास्त वेळ न घालवता, 'पास इन द पास' किंवा ट्रुथ अँड डेअरसारखे खेळ खेळता येतील, तसेच घरी बसून तुम्ही अंताक्षरी, दम शराज यांसारखे खेळ खेळू शकता. असे केल्याने तुमचा वेळ मजेत जाईल.
एकत्र बसून टीव्हीवर कार्यक्रम बघा
नवीन वर्षाच्या निमित्ताने टीव्हीवर अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलं जातं. अशा वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर घरी बसून हे कार्यक्रम पाहू शकता आणि नवीन वर्षाचं स्वागत करू शकता.
स्पेशल पदार्थ बनवा
एखादा सण आणि चविष्ट पदार्थ हे कॉम्बिनेशन अगदी बेस्ट आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही काही खास पदार्थ तयार करू शकता. अशा वेळी तुम्ही घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि मुलांनाही आवडतील असे पदार्थ घरच्या घरी तयार करू शकता. तुम्ही जेवणासाठी काही मनोरंजक स्टार्टरची योजना करू शकता. अशा वेळी बटर चिकन, मटार कबाब, भजी, पिझ्झा, बर्गर किंवा चमचमीत पदार्थ तयार करू शकता.
काउंटडाउन सुरु करा
कुटुंबीयांसह नवीन वर्षच्या स्वागतासाठी काउंटडाउन सुरु करणे यापेक्षा चांगला आनंद नाही. यासाठी तुम्ही रात्री 12 वाजता, फटाके फोडून किंवा फुगे उडवून, एकमेकांना शुभेच्छा देऊन नवीन वर्ष साजरे करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत घरबसल्या अतिशय आनंदात करू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.