Kiss Day 2022 : ‘किस डे’ हा व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine Week 2022) सातवा दिवस आहे. 13 फेब्रुवारी रोजी ‘किस डे’ (Kiss Day 2022) साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांबद्दलच्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी एकमेकांचे चुंबन घेतात. चुंबन घेतल्याने केवळ मनाला आनंद मिळत नाही, तर आरोग्यही चांगले राहते. अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, किस केल्याने प्रति मिनिट 2 कॅलरीज बर्न होतात. याशिवाय चुंबन घेताना मेंदूमधून अशी रसायने बाहेर पडतात, जी मनाला शांत, ताजेतवाने आणि तणाव कमी करण्यास मदत करतात.


मात्र, कोरोना व्हायरससारख्या महामारीच्या काळात, सामाजिक अंतर किंवा इतर काही कारणांमुळे अनेक जोडप्यांसाठी हा दिवस साजरा करणे थोडे कठीण होऊ शकते. पण, या दिवशी आपल्या खास व्यक्तीसाठीच्या भावना व्यक्त करणे देखील आवश्यक आहे. अशा परिस्थितीत या ‘किस डे’ला तुम्ही ‘या’ हटके आयडिया वापरून आणखी स्पेशल बनवू शकता.


फ्लाइंग किस


कोणास ठाऊक होते की, आपण लहानपणी जे शिकलो ते COVID-19 दरम्यान उपयोगी पडेल. होय, आपण फ्लाइंग किसबद्दल बोलत आहोत. थेट स्पर्श न करता, जोडीदाराच्या दिशेने हळुवार फुंकर मारण्याला ‘फ्लाइंग किस’ म्हणतात. हे फ्लाइंग किस देऊन तुम्ही यंदाचा ‘किस डे’ साजरा करू शकता.


व्हर्चुअल किस


कोरोना काळात आभासी चुंबन अर्थात व्हर्चुअल किस हा देखील एक चांगला पर्याय आहे. व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप्स, झूम, व्हॉट्सअ‍ॅप याशिवाय अनेक ऑनलाईन अ‍ॅप्स आहेत, ज्यांना खास व्हर्च्युअल लव्ह मेकिंगसाठी क्युरेट केले गेले आहे. जोडीदारापासून किंवा आपल्या खास व्यक्तीपासून दूर जरी असाल, तरी या हटके पर्यायाने दिवस खास बनवू शकता.


किस इमोजी


जेव्हा आपण खास व्यक्तीला मेसेज पाठवतो किंवा चॅट करत असतो, तेव्हा हे संभाषण किस इमोजीशिवाय अपूर्ण असते. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप असो किंवा फेसबुक किंवा इतर कोणतेही अ‍ॅप, सर्वत्र एकापेक्षा एक इमोजी असतात. या ‘किस डे’च्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला किसिंग इमोजीद्वारे किस करू शकता.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha