Maharashtra police station : राज्यातील पाच पोलीस ठाण्यांचा केंद्र सरकारकडून सन्मान करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलातील उत्कृष्ट काम करणाऱ्या, गुन्हेगारीला प्रतिबंध करणाऱ्या सर्वोकृष्ट पाच पोलीस ठाण्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या (Union Home Ministry) वतीने पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार मिळालेल्या पाचही पोलीस ठाण्यांचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) यांनी अभिनंदन केले आहे. या पुरस्कारांमुळे आता इतर पोलीस ठाण्यांनाही केंद्राच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल असे वळसे पाटील म्हणाले.
या पाच पोलीस ठाण्यांना पुरस्कार
पुरस्कार मिळालेल्या पोलीस ठाण्यांमध्ये वाळुंज पोलीस ठाणे (औरंगाबाद शहर), बाभुळगाव पोलीस ठाणे (यवतमाळ), सेवली पोलीस ठाणे (जालना), जोडभावी पोलीस ठाणे (सोलापूर) आणि राजूर पोलीस ठाणे (अहमदनगर) या पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या सर्व पोलीस ठाण्यांचे वळसे पाटील यांनी अभिनंदन केले आहे. उत्कृष्टपणे काम, गुन्हेगारीला प्रतिबंध करण्याबरोबरच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहीत करण्यासाठी राज्य पातळीवर पाच सर्वोकृष्ट पोलिस ठाण्यांची निवड करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देशातील दहा पोलीस ठाण्यांना उत्कृष्ट पोलिसांचा पुरस्कार दिला जातो. राज्यस्तरीय पुरस्कारामुळे आता इतर पोलीस ठाण्यांनाही केंद्राच्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kirit Somaiya : पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील चहावाल्याला! सोमय्या थेट चहावाल्याच्या दुकानात, पाहणी करुन म्हणाले...
- Maghi Ekadashi 2022 : 'अवघे गरजे पंढरपूर'... माघी एकादशीनिमित्त कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच गजबजली पंढरी; चार लाख भाविक दाखल
- Pune : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर आता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती