Valentine Week 2022: "जिंदगी की किताब में कुछ पन्ने खास होते हैं, कुछ अपने तो कुछ बेगाने होते हैं, प्यार से संवर जाती है जिंदगी, जब रिश्तों में चॉकलेट की तरह मिठास होती है". व्हॅलेंटाईन वीकमधील तिसरा दिवस म्हणजे नात्यातला गोडवा वाढवणारा....चॉकलेट डे. प्रेमाचं नातं हे चॉकलेटप्रमाणे असावं, अगदी गोड...असंच सर्वांना वाटत असतं. म्हणून आजचा दिवस म्हणजे 9 फेब्रुवारी हा चॉकलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो. 


प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेले अनेकजण व्हॅलेंटाईन वीकमधील 'चॉकलेट डे'ची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या आवडत्या व्यक्तीवर, जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी चॅाकलेटसारखा दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच व्हॅलेंटाईन वीकमध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. 


आज बाजारात अनेक प्रकारचे चॉकलेटचे प्रकार उपलब्ध आहेत. परंतु डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी चॉकलेट घेणार असाल तर डार्क चॉकलेट किंवा ज्यामध्ये कोकोचे प्रमाण जास्त आहे, असे चॉकलेट खरेदी करा आणि आपल्या प्रेमाच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाका.


'रोज डे' आणि 'प्रपोज डे'चा यशस्वी प्रयोग केला असेल तर मग आजच्या 'चॉकलेट डे'ने तुमच्या प्रेमाच्या प्रवासाचा गोडवा वाढवा. जर व्हॅलेंटाईन वीकचे पहिले दोन दिवस वाया गेले असतील तरीही 'चॉकलेट डे'च्या निमित्ताने एक गोड सुरुवात करा. कारण असं म्हटलं जातंय की, "कुछ मीठा हो जाये, कुछ प्यार हो जाये, मोहब्बत अपनी बेशुमार हो जाये, दिन है चॉकलेट डे का, तो चलो आज कुछ मीठा हो जाये."  


चॉकलेट खाण्याचे फायदे
चॉकलेटमुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे होतात. यामधील नैसर्गिक तत्वे आपल्याला आनंदी आणि तजेलदार ठेवण्यास मदत करतं. विशेषत; चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन आपल्याला आनंदी आणि मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. चॉकलेटचं सेवन आपल्या हृदयासाठी सुद्धा उत्तम ठरतं. 'डार्क चॉकोलेट' खाण्यामुळे हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.


संबंधित बातम्या: